राज विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:31 IST2020-12-16T04:31:46+5:302020-12-16T04:31:46+5:30
जळगाव : येथील राज प्राथमिक व माध्यामिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथीनिमित्त नगरसेविका जयश्री महाजन यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला ...

राज विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली
जळगाव : येथील राज प्राथमिक व माध्यामिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथीनिमित्त नगरसेविका जयश्री महाजन यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. वाय. बऱ्हाटे यांनी केले. आभार प्रफुल्ल नेहते यांनी मानले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालय
येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथीनिमित्त अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जयश्री पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, समन्वयक विकास पवार , सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल भारतीय लेवा विकास महासंघ
अखिल भारतीय लेवा विकास महासंघातर्फे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. ए. जी. भंगाळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेेते डॉ. सुनील महाजन, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, डॉ. स्नेहल फेगडे, प्राचार्य डॉ. प्रशांत वारके, विलास नेहते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भंगाळे विद्यालय
युवा विकास फाउंडेशन संचलित सि. ग. भंगाळे माध्यामिक विद्यालयात मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक प्रफुल्ल सरोदे, विजया चौधरी, दीपनंदा पाटील, अनुपमा कोल्हे, स्वाती पगारे, सचिन महाजन, दीपक भारंबे, विजय नारखेडे, प्रशांत भारंबे, भूषण भोळे उपस्थित होते.
जैन प्राथमिक विद्यालय
जळगाव : येथील स्व. शेठ बी. एम. जैन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक भास्कर फुलपगार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिक्षक उपस्थित होते.