मुक्ताईनगर येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे मीनाताई ठाकरे यांना आदरांजली अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 16:14 IST2021-01-06T16:13:48+5:302021-01-06T16:14:08+5:30
मुक्ताईनगर येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे मीनाताई ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

मुक्ताईनगर येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे मीनाताई ठाकरे यांना आदरांजली अर्पण
मुक्ताईनगर : येथील तहसील कार्यालय व पंचायत समिती रस्त्यावर असलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना परिवारातर्फे बुधवारी स्व.मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पार्पण व पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, नगरसेवक तथा उपगटनेता संतोष मराठे, युवासेना शहर संघटक आकाश सापधरे, रोहिदास शिरसाट, नगसेविका सविता भलभले, महिला आघाडी जिल्हा संघटिका कल्पना पालवे, उपजिल्हा संघटिका सुषमा शिरसाट, तालुका संघटिका शोभा कोळी, उपतालुका संघटिका यशोदा माळी, तालुका समन्वयक सुनीता तळेले, तालुका उपसमन्वयक उज्वला सोनवणे, शहर संघटिका सरिता कोळी, उपशहर संघटिका शारदा भोई, ग्रा.पं.च्या माजी सदस्या अनिता मराठे, कीर्तनकार दुर्गा मराठे, माया मराठे, नर्मदा गोसावी, अलका मराठे, हसीना तडवी, लताबाई इंगळे, प्रमिलाबाई पाटील यांच्यासह आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी, ब्रिजलाल मराठे, पप्पू मराठे, रवींद्र दांडगे, शुभम शर्मा, ज्ञानेश्वर पाटील, मनोज मराठे आदी उपस्थित होते.