जे.टी.महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 02:05 PM2020-11-10T14:05:16+5:302020-11-10T14:05:41+5:30

शिक्षण महर्षी जे.टी.महाजन यांना पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळावर मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Tribute to JT Mahajan on the occasion of Punyatithi | जे.टी.महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धाजली

जे.टी.महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धाजली

Next

फैजपूर : येथील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी माजी गृहराज्यमंत्री व तंत्र व वैद्यकशिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण तथा सहकार महर्षी जे.टी.महाजन यांना पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळावर मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
महाविद्यालयाच्या आवारातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला संस्थेचे सचिव विजय झोपे, सहसचिव मार्तंड भिरूड, संचालक प्रभाकर सरोदे, शशिकांत चौधरी यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली, तर संस्थेचे अध्यक्ष तथा मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन व जि.प. च्या माजी सदस्या आरती महाजन यांनीही पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी
संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास चौधरी, दामोदर चौधरी, भरत चौधरी, बी .व्ही बोरोले, एस .एल.तळेले, एस.इ .पाटील, नरेंद्र नारखेडे, संचालक मंडळातील मान्यवरांच्या हस्ते तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, आय.टी.आय., इंग्लिश मीडियम स्कूल व साखर कारखान्याचे सर्व संचालक व पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही समाधी स्थळावर पुष्प अर्पण करून श्रद्धाजली वाहिली.

जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.डी. पाटील, सर्व विभागप्रमुख डॉ.ए.एम. पाटील, प्रा डॉ एन. डी. नारखेडे, प्रा. आर.के.मालविया, प्रा. डॉ.डी.ए.वारके, प्रा. डॉ.डी. के. किरंगे, डीन डॉ.पी.एम महाजन, तंत्रनिकेतन प्राचार्य प्रा.पी.एम.राणे , आय.टी.आय., प्राचार्य प्रा.प्रवीण फालक, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सोसेस जाधव व प्रा.नंदकिशोर सोनावणे उपस्थित होते.,

 

Web Title: Tribute to JT Mahajan on the occasion of Punyatithi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app