शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पाल येथे घरी परतणाऱ्या आदिवासी कामगारांची पहूरच्या संघपतींनी भागविली भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 3:15 PM

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : सिल्लोड येथून पाल, ता.रावेर येथे पायदळ निघालेले आदिवासी मजूर पहूर येथे सोमवारी सकाळी पोहोचले. पहूर ...

ठळक मुद्दे५० किलो मीटरचा पायी प्रवासपोलिसांकडून मदतीचा हात

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : सिल्लोड येथून पाल, ता.रावेर येथे पायदळ निघालेले आदिवासी मजूर पहूर येथे सोमवारी सकाळी पोहोचले. पहूर जैन संघटनेचे संघपती यांचा परिवार धावून आला. यावेळी चाळीस ते पंचावन्न मजुरांना जेवण देऊन भूक भागविली व पुढे मार्गस्थ केले.सिल्लोड येथे पाल येथील चाळीस ते पंचावन्न मजूर कामासाठी गेले होते. मात्र कोरोणा च्या संक्रमणामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावल्याने आपल्या लहान मुलांसह परिवाराला घेऊन पायदळ गावाकडे निघाले आहे. एवढे अंतर पार करून पहूर बसस्थानकात विसावा घेतला. यादरम्यान बंदोबस्तातील साहाय्यक गजानन ढाकणे, ज्ञानेश्वर बाविस्कर, जगदीश चौधरी या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पाणी व बिस्कीट अशी व्यवस्था करून ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करून दिली. जेवणासाठी जैन संघटनेचे संघपती हिरालाल छाजेड यांना आवाहन केले. त्यानुसार संजय हिरालाल छाजेड, संदेश छाजेड यांनी भाजप व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष ललित लोढा यांच्या जामनेर महामार्गावरील शेतात जेवनाची व्यवस्था करून दिली व सर्व मजुर पायदळ मार्गस्थ झाले. या माध्यमातून पहूर पोलीस व संघपती हिरालाल छाजेड यांचे व परिवाराचा माणुसकीचा ओलावा समोर आला आहे.