The trees burned again on the hill of Ambarshi | अंबर्षी टेकडीवर झाडे पुन्हा जाळली
अंबर्षी टेकडीवर झाडे पुन्हा जाळली

ठळक मुद्देवारंवार होणाऱ्या विध्वंसक कृत्यामुळे पाणी शुद्धीकरण व घनकचरा प्रकल्पालाही धोका१५० मीटरपर्यंत आग पसरली होती

अमळनेर, जि.जळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालणारी व पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना असलेल्या अंबर्षी टेकडीवर पुन्हा एकदा झाडे जाळण्याचा विध्वंसक प्रकार २० रोजी पहाटे घडला. गेल्या काही दिवसात चौथ्यांदा हा प्रकार घडल्याने निसर्गप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत चार वेळा झालेल्या प्रकारात वेगवेगळ्या ठिकाणी या आगी लावण्यात आल्या आहेत. सायकलचे टायर जाळून हा प्रकार केल्याचे टेकडीवर मॉर्निंग वॉक व व्यायाम करणाऱ्यांच्या निदर्शनास आले. पहाटे पहाटे हा प्रकार केला असल्याने सकाळपर्यंत आगीची धग सुरू होती. टेकडी ग्रुपच्या सदस्यांनी पालिकेला तत्काळ कळवून अग्निशामक बंब मागवला. कर्मचारी नितीन खैरनार, दिनेश बिºहाडे, फारुख शेख, आनंदा धनगर आदींनी आग विझवली.
सुमारे १५० मीटरपर्यंत आग पसरली होती. यावेळेस लागलेल्या आगीचे प्रमाण जास्त होते. प्रांताधिकारी सीमा आहिरे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक दररोज सकाळी टेकडीवर येत असतात. तरी विघातक कृत्य केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, टेकडीवरच अमळनेर शहराचा पाणी शुद्धीकरण व पुरवठा प्रकल्प आणि दुसºया बाजूला घनकचरा प्रकल्प आहे. विध्वंसक प्रकार वाढल्याने भविष्यातील अनर्थ घडू नये म्हणून सीसी टीव्ही कॅमेरे बसवन्याची मागणी अंबर्षी टेकडी ग्रुपने केली आहे.

Web Title:  The trees burned again on the hill of Ambarshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.