शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेंदुर्णी नगर पंचायतीमार्फत वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 12:24 IST

माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.

शेंदुर्णी (ता. जामनेर) : येथील चक्रधरनगरातील खुल्या भूखंडात गुरुवारी माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सर्व नगरसेवक व कर्मचारी वृंद व नागरिक यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात करण्यात आली..वृक्षांमध्ये वड, पिंपळ, गुलमोहर, उंबर, करंज, पुत्रंजिवा, चिंच व बकुळ अशी भारतीय प्रजातींचे वृक्ष लावण्यात आले.संपूर्ण शेंदुर्णी हरित व्हावे या हेतूने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे व भविष्यातही करण्यात येणार आहे. निसर्गाचा समतोल राखावा, शेंदुर्णी शहर प्रदूषणमुक्त राहावे, यासाठी माझी वसंधुरा अभियान सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे नगराध्यक्षा खलसे यांनी सांगितले.सर्वांना स्वच्छता, आरोग्य, निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी तसेच वसुंधरेशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदलाचे महत्त्व सांगून स्वच्छ व सुंदर शेंदुर्णी कसे करता येईल, यासंदर्भात उपनगराध्यक्षा अग्रवाल यांनी माहिती दिली.माझी वसुंधरा हे अभियान शासन संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे. ही केवळ सरकारी मोहीम किंवा अभियान न राहता, प्रत्येकाने पर्यावरणातील बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक केली पाहिजे. या मोहिमेत वृक्ष लागवडीबरोबर वृक्षाचे संवर्धन करणे व शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे, याची संकल्पना व माहिती मुख्याधिकारी पिंजारी यांनी दिली.

टॅग्स :environmentपर्यावरणJamnerजामनेर