इच्छापूर-निमखेडी बुद्रूक येथे वृक्षारोपण, सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:36+5:302021-07-02T04:12:36+5:30

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष यू. डी. ...

Tree planting at Ichchapur-Nimkhedi Budruk, felicitation | इच्छापूर-निमखेडी बुद्रूक येथे वृक्षारोपण, सत्कार

इच्छापूर-निमखेडी बुद्रूक येथे वृक्षारोपण, सत्कार

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील, प्रदीप साळुंके, रमेश खंडेलवाल, राजू ढोले, प्रवीण दामोदरे, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष शाहिद खान, पुंडलिक पाटील, रमेश वानखेडे, मोहन धात्रक, राजू भडांगे, अनंता खिर्डेकर, मंगेश बेलदार, गणेश बोंडे, प्राचार्य एस. के. तायडे, माजी प्राचार्य एस.एम. महाजन, पांडुरंग नाफडे, शिवा पाटील, रवी पाटील हे उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शाळेच्या आवारात पिंपळ, लिंब, सिसम यासारख्या वृक्षांची पुन्हा लागवड करण्यात आली. तसेच वृक्ष संवर्धन करण्यासंदर्भात मान्यवरांनी गावकऱ्यांना शपथही दिली.

सूत्रसंचालन विनायक वाडेकर यांनी, तर आभार महेंद्र तायडे यांनी मानले. स्वागतगीत प्रा. विद्या मंडपे यांनी म्हटले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशा कांडेलकर, बी. के. महाजन, सुधीर मेढे, बाळासाहेब देशमुख, मनोज भोई, प्रदीप पाटील, गणेश पवार, मीनल कोल्हे, गोपाळ सपकाळ, विनोद पाटील, आशिष धाडे, व्ही. आर. भवराय यांनी प्रयत्न केले.

Web Title: Tree planting at Ichchapur-Nimkhedi Budruk, felicitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.