भुसावळात भारत विकास परिषदेतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 16:21 IST2020-08-05T16:21:24+5:302020-08-05T16:21:37+5:30

भारत विकास परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय (ट्राम सेंटर) परिसरात ‘एक सदस्य एक वृक्ष’ याअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

Tree planting in Bhusawal by Bharat Vikas Parishad | भुसावळात भारत विकास परिषदेतर्फे वृक्षारोपण

भुसावळात भारत विकास परिषदेतर्फे वृक्षारोपण




भुसावळ : भारत विकास परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय (ट्राम सेंटर) परिसरात ‘एक सदस्य एक वृक्ष’ याअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
आमदार संजय सावकारे, डीवायएसपी गजानन राठोड प्रमुख अतिथी होते. भारत विकास परिषदेचे प्रांत सचिव योगेश मांडे, अध्यक्ष विलास फालक, सचिव भूषण वाणी, कोषाध्यक्ष विजय जोशी, डॉ. नीलिमा नेहते, वृक्षारोपण समितीप्रमुख संजय चौधरी, संजय लाहोटी व सर्व सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
भारत विकास परिषदेच्या प्रत्येक सदस्याच्या हस्ते एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करून पर्यावरण संवर्धन करण्याचा परिषदेचा मानस आहे.
या कार्यक्रमासाठी श्याम दरगड, किशोर शिंपी, कपिल मेहता, विशाल अग्रवाल, भूषण वैद्य, हरीश कोल्हे, महेश भाटिया, रुपेश जैन सतीश खडायते, गौरव हिंगवे आनंद फडके यांंनी परिश्रम घेतले.

Web Title: Tree planting in Bhusawal by Bharat Vikas Parishad