अमळनेर तालुक्यात वृक्ष चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:50+5:302021-08-19T04:22:50+5:30

फोटो अमळनेर: तालुक्यात बिहार पॅटर्नअंतर्गत वृक्षारोपणाची मोहीम जोर धरू लागली आहे. यात धानोरा भोरटेक ग्रामपंचायतीने या वर्षी साडेसोळा ...

Tree movement in Amalner taluka | अमळनेर तालुक्यात वृक्ष चळवळ

अमळनेर तालुक्यात वृक्ष चळवळ

फोटो

अमळनेर: तालुक्यात बिहार पॅटर्नअंतर्गत वृक्षारोपणाची मोहीम जोर धरू लागली आहे. यात धानोरा भोरटेक ग्रामपंचायतीने या वर्षी साडेसोळा हजार वृक्षलागवड उपक्रमाची सुरुवात जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.

दुष्काळामुळे वृक्षलागवड काळाची गरज झाली असून, त्यांना जतन करणं हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं प्रतिपादन जयश्री पाटील यांनी केलं.

यावेळी सरपंच दिलीप हिरालाल ठाकरे, उपसरपंच अमोल दिलीपसिंग राजपूत, ग्रामरोजगार सेवक संदीप सुभाष राजपूत, ग्रामसेवक नितीन भूपेंद्र राजपूत, ग्रामपंचायत सदस्य गुलाब पाटील, सुनील भील, नाना भील, अशोक कडरे, मनोज राजपूत, बन्सीलाल राजपूत, किशोर परदेशी, प्रवीण राजपूत, आकाश कोळी, योगेश राजपूत, कैलास परदेशी, अमृत राजपूत,संग्राम परदेशी, संदीप राजपूत, मोहन धनगर, नंदू उत्तम राजपूत, ईश्वर परदेशी, पप्पू धनगर, छबिलाल भिल, हिरामण भिल, अण्णा कडरे, बापुजी नारायण, जय राम भिल, मुकुंदा भिल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दापोरी येथे हजार बांबूची रोपे

पातोंडा, ता.अमळनेर : दापोरी बुद्रुक येथे स्वातंत्र्य दिनी गावांमध्ये पाणी फाउंडेशनचे समृद्धगाव योद्धे, ग्रामपंचायत व शेतकरी यांच्या पुढाकाराने एक हजार बांबूच्या रोपांची वृक्षलागवड करण्यात आली.

येथील तरुणांनी एक पाऊल पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी ही संकल्पना राबविली पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप व समृद्धगाव स्पर्धेमध्ये नाला खोलीकरण रुंदीकरण केलेले दापोरी बु. येथील प्रगतशील शेतकरी कैलास लहु पाटील यांनी आपल्या शेतालागून नाला काठावरती २०० बांबूच्या रोपांचे वृक्षारोपण केले. सरपंच, कर्मचारी, सदस्य, पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव योद्धे, यांच्या प्रयत्नातून सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून मिळालेल्या बांबूच्या रोपांची वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये संदीप पाटील सरपंच मृणाल पाटील, माजी सरपंच विजय पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Tree movement in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.