शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जन्मदात्या मातापित्यांप्रमाणेच वृक्ष सेवा करून वृक्ष संवर्धन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 6:39 PM

कुलगुरू पी .पी. पाटील यांचे प्रतिपादन : १०१ वृक्षांचे रोपण

जळगाव : जन्मदात्या मातापित्यांप्रमाणेच वृक्ष सेवा करून वृक्ष संवर्धन करावे, असे प्रतिपादन बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू मा . पी.पी. पाटील यांनी केले.जनमत प्रतिष्ठान व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे १०१ वृक्ष रोपण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंकज नाले, विजय लुल्हे आदी उपस्थित होते. निवृत्ती नगर येथील कार्तिक स्वामी मंदिराच्या प्रांगणात कुलगुरू पाटील यांच्या हस्ते नीम, चिंच, सीताफळ या वृक्षांचे रोपण करून अभियानास प्रारंभ झाला. त्याप्रसंगी नगरसेविका अनिता सोनवणे, प्रतिभा देशमुख, विजय पाटील , विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक फौजदार विश्वासराव पाटील यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला कै.किसन नाले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कुलगुरू यांनी केले. त्यानंतर नाले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्‍यात आले.पुस्तक दिले भेटराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने विजय लुल्हे प्रकाशित गांधीजींचे सात सामाजिक पातके व एकादश व्रते पोस्टर्स कुलगुरू पी .पी. पाटील तसेच मान्यवरांना लुल्हे यांनी सन्मानपूर्वक भेट दिली. नंतर कुलगुरू यांच्या हस्ते एस . के .पवार यांना वृक्ष दान करण्यात आले. कार्यक्रमास प्रा.वासुदेव पाटील, विवेक देसाई, राहुल लोखंडे, प्रशांत सुर्वे आणि परिसरातील वृक्षप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनमत प्रतिष्ठानचे सदस्य हर्षाली पाटील , वेदांत नाले ,चित्रा मालपाणी, भारती नाले यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव