३०२ रुग्णांवर जनआरोग्य योजनेतून उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST2021-04-06T04:15:47+5:302021-04-06T04:15:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आर्थिक वर्षात ३०२ रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य ...

३०२ रुग्णांवर जनआरोग्य योजनेतून उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आर्थिक वर्षात ३०२ रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात आले आहे. गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु झालेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट कार्य झाल्याबद्दल राज्य शासनानेदेखील जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे.
योजनेसाठीचे कार्यालय रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागात असून येथे २ डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासह नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. योजनेमधून १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत कोरोना विरहित आणि कोरोनाबाधित ३०२ रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये वर्षभरात कोरोनासह किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डायलिसिस आदी आजारांनी ग्रस्त रुग्णांनादेखील लाभ झाला आहे.
योजनेचे अध्यक्ष तथा उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक तथा योजनेचे सचिव डॉ. वैभव सोनार, नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील, आरती दुसाने हे रुग्णांसह नातेवाईकांना सहकार्य करून माहिती देत आहेत.