परिवर्तनने जळगावचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:42+5:302021-08-21T04:21:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कला आणि संस्कृतीचं विश्व हे साहित्य, चित्र, संगीत, नाट्य या कलांनी समृद्ध होत असतं. ...

परिवर्तनने जळगावचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कला आणि संस्कृतीचं विश्व हे साहित्य, चित्र, संगीत, नाट्य या कलांनी समृद्ध होत असतं. परिवर्तनचे उपक्रम हे सकस व सशक्त असून जळगावचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले असल्याचे उद्गार ‘स्व.पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा’च्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले आहेत.
परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्व.पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा’चे उद्घाटन शुक्रवारी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार प्राप्त नाशिक येथील नाट्यलेखक दत्ता पाटील यांचा सन्मान ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित डॉ भालचंद्र नेमाडे व पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आला. महोत्सवाची सुरवात जगप्रसिद्ध लेखिका अमृता प्रितम व गीतकार साहिर लुधियानवी, इमरोज यांच्या प्रेमावर व जीवनावर आधारित शंभू पाटील लिखित “अमृता साहिर इमरोज’ या नाटकाने करण्यात आली. अमृता प्रितम यांच्या लेखन प्रवासाविषयी, साहिर यांच्या गीत लेखनातील अमृता, यांच्या जीवनातील घटना व प्रेमाच्या आठवणीनी रसिकांना साहिर, अमृता व इमरोज नाटकातून अनुभवता आले. नाटकात प्रमुख भूमिका शंभू पाटील व हर्षदा कोल्हटकर यांनी साकारल्या तर दिग्दर्शन मंजुषा भिडे यांचे, पार्श्वसंगीत राहुल निंबाळकर , नेपथ्य मंगेश कुलकर्णी, वेशभूषा सोनाली पाटील यांचे होते. महोत्सवात शनिवारी पुणे निर्मित जेष्ठ नाटककार रामू रामनाथन लिखित व अतुल पेठे दिग्दर्शीत "शब्दांची रोजनिशी" हे नाटक सादर होणार आहे.