पाच सहायक निबंधकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:26 AM2019-06-02T11:26:43+5:302019-06-02T11:27:11+5:30

रिक्त जागांमध्ये आणखी भर

Transfers of five Assistant Registrars | पाच सहायक निबंधकांच्या बदल्या

पाच सहायक निबंधकांच्या बदल्या

Next

जळगाव : सहकार विभागातील पाच सहाय्यक निबंधकांच्या जिल्ह्यातून इतरत्र बदल्या असून त्यांना रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून पाच जणांच्या बदल्या झाल्या असल्या तरी जिल्ह्यात केवळ एकच जण आले आहे. यामुळे आधीच रिक्त असलेल्या जागांमध्ये आणखी भर पडली आहे.
एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या बदल्यांमध्ये महसूल विभागापाठोपाठ आता सहकार विभागातीलदेखील बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जळगावातील उप निबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधकांसह बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा येथील सहाय्यक निबंधकांचा समावेश आहे. या शिवाय भुसावळ येथे सहायक निबंधक म्हणून पुणे येथून एन.के. सूर्यवंशी यांची बदली झाली आहे.
बदली झालेले सहाय्यक निबंधक (कंसात बदलीचे ठिकाण)
आर.एम. जोगदंड, बोदवड (चाकूर, जि. लातूर), ए.डी. बागल, मुक्ताईनगर (शिरपूर, जि. धुळे), आर.एस. भोसले, जळगाव (वाडा, जि. पालघर), एम.आर. शहा, जामनेर (जळगाव), पी.एस. पाटोळे, पाचोरा (चांदवड, जि. नाशिक).
बदल्यांमुळे रिक्त जागांमध्ये भर
सहकार विभागात अगोदरच १० सहायक निबंधक व एक उप निबंधक अशा एकूण ११ जागा रिक्त आहेत. त्यात या बदल्यांमुळे आणखी भर पडली आहे. जळगावातील उप निबंधक हे वर्ग एकचे पद रिक्त असून या सोबतच उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधकांची दोन पदे रिक्त आहेत. या सोबतच यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, एरंडोल, पारोळा, भडगाव, पाचोरा येथील सहाय्यक निबंधकांचे पद रिक्त आहे.
कर्ज माफी व त्यातील खात्यांची माहिती ठेवणे, जिल्ह्यातील पतसंस्थांची स्थिती, बाजार समितीचे काम अशा वेगवेगळ््या कामांची प्रक्रिया सुरू ठेवत असताना रिक्त जागांमुळे त्यात अडचणी येतात. त्यामुळे ही पदे तत्काळ भरली जावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Transfers of five Assistant Registrars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव