कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:38+5:302021-08-22T04:19:38+5:30

चाळीसगाव : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड घाटात गात चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी सकाळी ...

Traffic congestion due to landslide in Kannada Ghat | कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा

कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा

चाळीसगाव : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड घाटात गात चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी सकाळी सात वाजता महादेव मंदिराजवळ दरड कोसळली. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. दुपारी बारा वाजता महामार्ग पोलिसांनी कोसळलेली दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. दुपारी चार वाजेपर्यंत घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

मंगळवारपासून चाळीसगाव परिसरात भिज पावसाने छत्री धरली आहे. शहराच्या दक्षिणेला आठ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील कन्नड घाटात दरड कोसळण्यासह मालवाहू गाड्या नादुरुस्त झाल्याने वाहतुकीचा चक्का जाम झाला. पीएसआय भागवत पाटील, हवालदार श्यामकांत सोनवणे, पोकॉ नितीन आगोणे, गणेश पवार, धनराज पाटील, दिवाकर जोशी, श्रीकृष्ण सोनार, प्रकाश चव्हाण यांनी दरड हटवून वाहतूक सुरळीत केली.

फोटो क्रमांक - २२एचएसके ०२

कन्नड घाटात कोसळलेली दरड हटविताना महामार्ग पोलीस. (छाया : जिजाबराव वाघ)

Web Title: Traffic congestion due to landslide in Kannada Ghat