भुसावळ : रेल्वे यार्डातील सीवायएम कार्यालयाजवळ शंटींग करून जाणाऱ्या रेल्वे मालगाडीवर ट्रॅक्टर धडकल्याची घटना ६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात ट्रॅक्टर चालक थोडक्यात बचावला.यार्डात दुपारी बीसीएन मालगाडी शंटींग करून माघारी जात असतांना खांबा क्रमांक एम वाय एल ६/१ व खांबा क्रमांक ४५३/७ या दोघांच्या मध्ये रेल्वे स्लीपर भरून जात असलेल्या ट्रॅक्टर क्र.एम.एच२०-ए वाय-६७४३ वरील चालक समीर करीम शाह रा.भारत नगर, भुसावळ याने येणाºया मालगाडीकडे दुर्लक्ष करून रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर मालगाडीने ट्रॅक्टरला सुमारे ३०-३५ फूट फरफटत नेले. ट्रॅक्टरचालक समीरने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने तो सुदैवाने बचावला. घटनास्थळी तात्काळ यार्ड आरपीएफचे निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, उपनिरीक्षक समाधान वाहूलकर,एएसआय देशराज सिंग आदींनी धाव घेत चौकशी केली. त्यांनी ट्रॅक्टर जप्त करून चालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी रेल्वे अॅक्ट कलम १५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळात मालगाडीवर ट्रॅक्टर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:16 IST
रेल्वे यार्डातील सीवायएम कार्यालयाजवळ शंटींग करून जाणाऱ्या रेल्वे मालगाडीवर ट्रॅक्टर धडकल्याची घटना ६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात ट्रॅक्टर चालक थोडक्यात बचावला.
भुसावळात मालगाडीवर ट्रॅक्टर धडकले
ठळक मुद्देभुसावळ रेल्वे यॉर्डातील घटनाट्रॅक्टरचालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने जीव वाचलाट्रॅक्टर जप्त करून चालकाला घेतले ताब्यात