तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर, डंपर पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:22 IST2019-02-27T00:22:02+5:302019-02-27T00:22:21+5:30
अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा

तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर, डंपर पळविले
धरणगाव : तत्कालीन तहसीलदारांनी तीन महिन्यापूर्वी अवैध वाहतूक करणारे पकडलेले चार ट्रक्टर व एक डंपर तहसील कार्यालयातून पळवून नेले. या प्रकरणी नायब तहसिलदांरांनी अज्ञात व्यक्तींविरुध्द धरणगाव पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या अडीच तीन महिन्यापूर्वी तहसीलदार सी.आर.राजपूत यांनी चार ट्रक्टर व एक डंपर पकडून ते तहसील कार्यालयात लावले होते. त्यांनी ट्रक्टरला प्रत्येकी १ लाख २० हजार व डंपरला २ लाखावर दंडाची नोटीस पाठवली होती. मात्र मालकांनी महसूलचा हा दंड न भरता तहसील कार्यालयातच वाहने पडू दिल्या होत्या. तहसील कार्यालयात लावलेली ही वाहने पळवून नेले. यासंदर्भात नायब तहसिलदार गणेश साळी यांनी दिलेल्या फिर्यादीत ट्रक्टर क्रमांक एम.एच.१९, बीएन ९६१३ (मालक सोपान पाटील,चांदसर), एमएच २८, ३५७७ (मालक गणपत नन्नवरे, बांभोरी) , एमएच १९, एएन ०७४६ (मालक राकेश पाटील,खर्दे), एमएच १९ ,एएन २८४८ (पंढरीनाथ शिरसाळे,बांभोरी) , डंपर क्र. एमएच ३१, सीबी ३५१७ (मनोज नन्नवरे, बांभोरी) हे अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेले.