भडगाव येथे आज सामान्यज्ञान स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 18:51 IST2019-01-04T18:48:57+5:302019-01-04T18:51:17+5:30
भडगाव येथील दत्ता पवार चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांच्यातर्फे ५ रोजी भडगाव शहरातील मुली व महिलांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे.

भडगाव येथे आज सामान्यज्ञान स्पर्धा
भडगाव, जि.जळगाव : येथील दत्ता पवार चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांच्यातर्फे ५ रोजी भडगाव शहरातील मुली व महिलांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे.
ही स्पर्धा दुपारी २ ते ३ या वेळेत होईल. स्पर्धा येथील सु.गि.पाटील विद्यालयात पार पडणार आहे. प्रथम गट अ आणि ब महिलांसाठी प्रथम १ ते ५ पैठणी व ६ ते १० साठी उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. दुसरा गट अ आणि ब मुलींसाठी प्रथम १ ते ५ साठी स्कूल बॅग, मनगटी घड्याळसह विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत.
१५ रोजी दुपारी १.३० वाजता बक्षीस वितरण समारंभ होईल. याकामी प्रशांत खांडेकर वृत्तपत्र वितरक, संजय सोनार, योगेश शिंपी यांचे सहकार्य लाभत आहे.