तितूर नदीपात्र अजूनही कोरडेठाक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:47+5:302021-08-22T04:19:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कजगाव, ता. भडगाव : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले, मात्र कजगाव परिसरात परिस्थिती काही वेगळीच ...

Titur river basin is still dry ... | तितूर नदीपात्र अजूनही कोरडेठाक...

तितूर नदीपात्र अजूनही कोरडेठाक...

लोकमत न्यूज नेटवर्क

कजगाव, ता. भडगाव : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले, मात्र कजगाव परिसरात परिस्थिती काही वेगळीच आहे. झिमझिम पडणाऱ्या पावसामुळे पीक जोमात आहे. मात्र नदी-नाले सारेच अद्याप कोरडे पडले असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. विहिरीच्या जल पातळ्या खोल गेल्या आहेत.

पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले. मात्र एखाद-दोन पावसाव्यतिरिक्त दमदार पाऊस नसल्याने पीक परिस्थिती अत्यंत खराब झाली होती तर बरड भागातील पिकांनी माना टाकल्या होत्या. पिके सुकू लागली होती.

दरम्यान, दि. १७ पासून या भागात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने पिके वाचली. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून या परिसरात सूर्यदर्शन झालेले नाही. चार दिवसांपासून या भागात रिमझिम पाऊस पडत आहे. एकही दमदार पाऊस या भागात न झाल्याने गावातील गटारीदेखील वाहल्या नसल्याने नदी नाले सारेच कोरडे पडले आहेत. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचे पात्र हिरव्या गवताने माखले आहे. यात चक्क गुरे चरत आहेत.

नदी-नाले कोरडेठाक

कजगाव परिसरातून तितूर नदी वाहते. पाटणादेवी येथे उगम असलेल्या या नदीवर अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे बनविण्यात आलेले आहे व काही के. टी. वेयर असल्याने काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे थोडेफार आलेले पाणी हे या बंधारे व के. टी. वेयर मध्ये अडकल्याने भडगाव तालुक्यातील हद्द असलेल्या उमरखेड शिवारापासून तितूर नदी कोरडीठाक पडली आहे. उगमवरून येणारे पाणी हे बंधाऱ्यात अडकत असल्याने भडगाव तालुक्यातील उमरखेड, भोरटेक, कजगाव, तांदूळवाडी, पासर्डी व पाचोरा तालुक्यातील पिंप्री व पासर्डी या गावातील नदी पात्र कोरडेठाक पडले आहे.

नदी पात्राचा उपयोग

गुरे चराईसाठी उमरखेड ते पासर्डी या परिसरातील नदीपात्रात हिरवेगार रान फुलले आहे. जेथे नदी दुथडी भरून वाहायला पाहिजे होती, तेथे चक्क हिरवे रान फुलले असल्याने याचा फायदा गुरे चराईसाठी होत आहे. अडीच महिन्यानंतर तितूर नदीची अशी परिस्थिती असल्याने जलपातळी खोल जात आहे.

नदी एकच कही खुशी, कही गम...

पाटणादेवीजवळ उगम पावलेली नदी पाचोऱ्याजवळ गिरणेस जाऊन मिळते. या नदीचे पात्र चाळीसगाव तालुका हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी बंधाऱ्यामुळे पाण्याने तुडुंब भरल्याने बळीराजा सुखावला आहे.

Web Title: Titur river basin is still dry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.