शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

थरारक आणि रोमांचकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:19 IST

बंगी जम्प, बलून सफारी, शार्क केज डायव्हिंग

दक्षिण आफ्रिकेत पर्यटनासाठी येणाºया लोकांना साहसी प्रकारांचा अनुभव घेता यावा, यासाठी नियोजनपूर्वक काही प्रकार विकसित करण्यात आले आहेत. थरारक, रोमांचकारी असे साहसी प्रकार हे खास वैशिष्ट्य आहेत. पर्यटकांमधील तरुण मंडळींना हे प्रकार विशेष भावतात आणि मोठी किंमत मोजून ते याचा आनंद घेतात. अर्थात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने अपघात वा दुर्दैवी घटना फारशा घडल्याचे कानावर पडले नाही.बलून सफारी : जोहान्सबर्गपासून उत्तरेला ४५ कि.मी. अंतरावर मगालीसबर्ग येथे बिल आणि मेरी हारुप या दाम्पत्याने दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम बलून सफारीला सुरुवात केली. १९८१ मध्ये ही सफारी सुरू झाली आणि त्यांनी कायदेशीर परवाना प्राप्त केला. सुमारे ८० वर्षीय बिल हारुप हा गृहस्थ म्हणजे मूर्तिमंत उत्साह. एक क्लब हाऊस आणि मोठे पटांगण असा परिसर. स्वमालकीचे ६ मोठे बलून. एका बलूनमध्ये ६ ते १८ पर्यटक उभे वा बसू शकतील, अशी व्यवस्था. पत्रकार मंडळी म्हटल्यावर स्वत:च्या बलूनमध्ये आम्हाला घेतले. चार सिलिंडरद्वारे गरम हवेचा उपयोग करीत बलून नियंत्रित केले जातात. सूर्योदयापूर्वी तासभर आधी ही सफारी सुरू होते. हवेची दिशा, वेग याचा शास्त्रीय अभ्यास करून बिल आणि त्याचे सहकारी सुरक्षित सफारी घडवितात. क्लब हाऊसमधून सफारी सुरू होत असली तरी उतरण्याची जागा हवेच्या दिशेवर अवलंबून असते. आम्ही एक कि.मी.अंतर लांबवर उतरलो.बंगी जम्प : प्लेटेनबर्ग बे पासून ४० कि.मी. अंतरावर ब्लोक्रान्स येथे जगातील सर्वात उंच उड्डाणपूल आहे. या पुलाच्या खाली उडी मारण्यासाठी तळ निर्माण केला आहे. भरभक्कम दोरखंडाने दोन्ही पाय पावलांजवळ एकत्रित आवळले जातात आणि त्यासोबतच पाठ-पोटाला घट्ट पट्टा बांधला जातो. उडी मारण्याचे धारिष्ट्य दाखविले, की पुढचे ५-७ मिनिटे म्हणजे स्वर्गीय आनंद असतो. १९९७ पासून हा साहसी प्रकार सुरू झाला. सर्वच मोसमात आणि आठवड्यात सर्व दिवस ही साहसी मोहीम करता येते. या हनुमान उडीचे छायाचित्र आणि व्हीडिओ चित्रण लगेच उपलब्ध होत असल्याने स्वत:च्या शूरपणाचे भक्कम पुरावे तुम्ही आयुष्यभर जगाला दाखवू शकता.जलप्रवास : हिंद महासागराचे शांत आणि रौद्ररूप जलप्रवासात अनुभवले. नायस्राजवळील खाडीतून समुद्रात जाण्याचे नियोजन होते. त्सुनामीचा इशारा असला तरी तसे घडेलच, असे अनुभवसंपन्न कॅप्टनला वाटत नव्हते. आम्हा १० जणांना घेऊन तो निघाला. अर्धा तास जलप्रवास एकदम छान झाला. निळाशार समुद्र. समुद्राच्या अवतीभवती असलेल्या पर्वतांवर टुमदार बंगले बांधलेले. समुद्रात काही ठिकाणी असलेल्या बेटांवर कार्यालये, हॉटेल बांधून जलक्रीडेचा आनंद पर्यटकांना उपलब्ध करून दिला होता. खाडीत एकांडे शिलेदार, जोडीने बोटिंग करणारे जोडपे, समूहाने जाणारे आमच्यासारखे मोठे जहाज घेऊन जाणारे पर्यटक दिसत होते. आम्ही समुद्राजवळ जाण्यापूर्वीच त्याचे रौद्ररूप आवाज आणि मोठ्या लाटांनी आम्हाला जाणवले. जहाज हेलकावे खात होते. सत्तरीच्या कॅप्टनला मोठी कसरत करावी लागत होती. परिस्थितीची जाणीव आमच्या चेहºयावर पाहून समुद्रात जहाज नेण्याचा निर्णय त्याने रहित केला. आम्ही माघारी फिरलो. हर्मानस येथील समुद्रात दुसºया दिवशी आम्ही शार्क पाहण्यासाठी पुन्हा गेलो. या वेळी समुद्र शांत होता. जहाजाला बांधलेल्या पिंजºयात उतरुन शार्क अगदी जवळून पाहिला. शार्कचे खाद्य दोरीच्या साहाय्याने समुद्रात टाकून त्यांना पिंजºयाजवळ आणले जाते, त्यामुळे पर्यटकांना शार्कचे जवळून दर्शन होते. खाºया आणि थंड पाण्यात १५-२० मिनिटे उभे राहणे तसे अनेकांना अवघड गेले. शार्कसाठी टाकलेले खाद्य सीगल पक्षी वरचेवर उडवत होते. ‘आयत्या बिळावर नागोबा’ या म्हणीची आठवण झाली.हेलिकॉप्टरमधून केपटाऊन शहराचे वैभव न्याहाळले. तर ‘शोले’ चित्रपटातील प्रसिध्द साईड कारमधून केपटाऊन शहराची गल्लीबोळ पालथी घातली. जंगल आणि शेतातून बाईक चालविण्याचा ‘क्वाड बाईकिंग’ हा अनुभव थरारक असाच होता. डोंगराच्या माथ्यापासून तर पायथ्यापर्यंत चार-पाच टप्प्यात ‘झिप लाईनिंग’ करताना ‘टारझन’च्या काळात पोहोचलो. अशा साहसी प्रकारांमुळे ही सहल कायमस्वरूपी लक्षात राहते, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.हॉट बलून सफारी : उंच आकाशात असल्याची अनुभूती आणि तेथून सूर्य, पृथ्वी बघण्याचा अवर्णनीय आनंदबंगी जम्प : जगातील सर्वाधिक उंच अशा पुलावरून म्हणजे २१६ मीटरवरून उडी मारली तेव्हा मनातील भय गायबजलप्रवास : त्सुनामीचा इशारा असताना केलेला जलप्रवास समुद्राने रोखलासाहसी प्रकार : सहल आयुष्यभर स्मरणात राहणारा ठेवा- मिलिंद कुलकर्णी

टॅग्स :Jalgaonजळगाव