भडगावनजीक बर्निंग कारचा थरार, अमरावती येथील नवरदेव बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:37 IST2023-02-14T13:36:36+5:302023-02-14T13:37:02+5:30
अमरावती येथून मालेगावला नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला.

भडगावनजीक बर्निंग कारचा थरार, अमरावती येथील नवरदेव बचावला
प्रमोद ललवाणी
कजगाव जि.जळगाव : अमरावती येथून मालेगावला नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. यातून नवरदेवासह पाच जण सुखरुपणे बचावले आहेत. ही थरारक घटना मंगळवारी पहाटे सहा वाजता कजगाव ता. भडगावनजीक घडली.
अमरावती येथील रोहन हरि डेंडुळे याचे आज मालेगाव येथे लग्न होते. त्यासाठी तो नातेवाईकांसह कारने निघाला होता. कजगावनजीक कारमध्ये वायर जळाल्याचे चालकाच्या लक्षात आले. रस्त्याच्या बाजूला घेत असतानाच कारने पेट घेतला. चालकाने लागलीच कारमधील पाचही जणांना खाली उतरवले आणि काही मिनिटातच कार जळून खाक झाली.
या थरारक घटनेतून नवरदेव रोहन डेंडुळे, आकाश शिवदास डेंडुळे, पूजा आकाश डेंडुळे, वैशाली अमर बागरे आणि चालक राहुल वैराळे असे पाच जण सुखरुप बचावले आहेत. मागून आलेल्या वरातीच्या वाहनातून नवरदेव व इतर लोक मालेगावकडे रवाना झाले.