१४ वर्षीय बालिकेवर तिघांनी केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:12 IST2019-05-17T18:11:49+5:302019-05-17T18:12:34+5:30

दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले

Three-year-old girl raped by three | १४ वर्षीय बालिकेवर तिघांनी केला बलात्कार

१४ वर्षीय बालिकेवर तिघांनी केला बलात्कार


xचोपडा: तालुक्यातील खाºयापाडा येथे रात्री शौचास गेलेल्या १४ वर्षीय बालिकेवर तिघा नराधमांनी बलात्कार केला. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत संतापजनक घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, १४ रोजी रात्री एका लग्नात नाचगाणी आटोपुन रात्री १० वाजता उघड्यावर शौचास गेलेल्या दोघां मैत्रिणींना तिघांनी हटकले. पैकी एकीने पळ काढला असता तिच्यामागे एक जण पळाला तर पीडित बलिकेच्या पाठीवर काठीने वार करीत बळजबरीने एका शेतात ओढत नेले. येथे एकाने दोन्ही हात धरीत तोंड दाबून दोघांनी आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केला. नंतर पीडिता जीव वाचावीत गावात पळत आली. याबाबत पीडितेच्या फिर्यादी वरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी कालू बुधा पावरा (१६) , मिथुन नांदल्या पवार (१६) व त्यांचा मित्र तिघे रा. खाºयापाडायांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी कालू बुधा पावरा (१६) , मिथुन नांदल्या पवार (१६) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर हे करीत आहेत.

Web Title: Three-year-old girl raped by three