रस्त्यावरील खांब हटविण्याबाबत बांधकाम विभागाचे तीन वेळा पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:44 IST2019-04-08T14:44:02+5:302019-04-08T14:44:08+5:30

शिवाजीनगर उड्डाणपूल : बांधकाम विभागाचे तीन वेळा पत्र, आयुक्तांकडून उत्तर नाही

Three times the letter of the construction department about the removal of the pillars of the road | रस्त्यावरील खांब हटविण्याबाबत बांधकाम विभागाचे तीन वेळा पत्र

रस्त्यावरील खांब हटविण्याबाबत बांधकाम विभागाचे तीन वेळा पत्र


जळगाव : रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर उड्डाण पुलावरील रेल्वे हद्दीतील बहुतांश काम आटोपले आहे. दुसरीकडे रस्त्यावरील विद्युत खांब आणि जलवाहिनी असल्यामुळे मोठाच अडथळा निर्माण झाला आहे. ते दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मनपा आयुक्तांना तीन वेळा पत्र पाठविण्यात आले आहेत. मात्र, या पत्रांवर मनपा आयुक्तांकडून कुठलेही उत्तर देण्यात आलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रेल्वे प्रशासनाने शिवाजी पूलावरील वाहतूक बंद करुन, २५ फेब्रुवारीपासून उड्डाण पूलावरील रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यांत खोदाईचे काम पूर्ण झाले असून, ९ एप्रिल रोजी गर्डर काढण्याचा अंतिम ठप्पाही पूर्ण केला जाणार आहे.
रेल्वे प्रशासनाने कामाला सुरुवात केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानदेखील मक्तेदारामार्फत जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. यावेळी गर्डर काढण्यासाठी पुलाच्या खोदाईचे काम न करता, जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन बांधकाम विभागाचे होेते. मात्र, या ठिकाणी पत्र्या हनुमान मंदिरासमोर असलेले महावितरणचे खांब व जलवाहिनीमुळे हे काम सुुरुच करण्यात आले नव्हते.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतरित करण्यासंदर्भात तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांना पत्र पाठविले होते.
मात्र, त्यांच्या या पत्रावर आयुक्तांकडून कुठलेही उत्तर देण्यात आले नाही. यानंतर पुन्हा आयुक्तांशी दोन वेळा पत्र व्यवहार करण्यात आला.
पत्राला उत्तर मिळेना
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे झालेल्या बैठकीत, जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाला महावितरणकडून या ठिकाणचे विद्युत खांब व पाण्याचे पाईपलाईन स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या होत्या. या सुचनांना अनुसरुन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मनपा आयुक्तांना पत्र व्यवहार करण्यात येत होता.
दीड महिन्यात तब्बल सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आयुक्तांना तीन वेळा पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र, पत्रांमुळे विद्युत खांब ना पाईपलाईनचे स्थलांतर झाले नसून, या पत्राला आयुक्तांकडून उत्तरही देण्यात आलेले नाही.
या तारखांना दिली गेली पत्र
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता या नावाने मनपा आयुक्तांना तीन वेळा पत्र दिले गेले. यामध्ये पहिले पत्र पहिले पत्र २० फेब्रुवारीला, दुसरे ६ मार्चला व तिसरे ३० मार्चला दिले आहे.
जिल्हा परिषदेजवळील पत्र्या हनुमान मंदिरापासून ते टॉवर चौकापर्यंत रस्त्याच्या मधोमध असलेली विद्युत खांबाची रांग स्थलांतरित करण्यासंदर्भात तीन वेळा आयुक्तांना पत्र दिले आहे. तसेच या ठिकाणी जल वाहिनी आहे. त्यादेखील स्थलांतरित करण्यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. बांधकाम विभागातर्फे करण्यात येणाऱ्या पुलाच्या कामासाठी हे अडथळे हटणे गरजेचे आहे. मात्र, मनपाकडून आमच्या पत्राला कुठलेही उत्तर देण्यात आलले नाही. अडथळे दूर झाल्यावरच पुढील कामाला सुरुवात होईल.
-प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सा. बां.विभाग, जळगाव

शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. त्या बजेटमध्ये अडथळा ठरणाºया विद्युत लाईनच्या स्थलातरांचा व ग्राऊंड केबलचा खर्चही त्यांत समाविष्ट करणे गरजेचे आहे. त्या विद्युत लाईनवर व्यावसायिकांचे कनेक्शनदेखील आहेत. त्या संदर्भात महापालिका प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले आहे. मनपा अंतर्गंत येणारे विद्युत पोल व पाईपलाईनही लवकरच स्थलांतर करण्यात येईल.
-डॉ.उदय टेकाळे, आयुक्त, मनपा

Web Title: Three times the letter of the construction department about the removal of the pillars of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.