शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तीन प्रकल्पांमुळे ५८ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:24 PM

अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश : सात बलून बंधाऱ्यांना मंजुरीमुळे गिरणा खोरे होणार समृद्ध

जळगाव /चाळीसगाव: शेळगाव बॅरेज ता.जळगाव, गिरणा नदीवरील सात बलून बंधारे मध्यम प्रकल्प व बोदवड परिसर उपसा सिंचन योजना या एकूण ५ हजार ५०६ कोटींच्या तिन्ही प्रकल्पांना केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीची मंजुरी सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत देण्यात आली. या तिन्ही प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील ५८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीची १४३ वी बैठक केंद्रीय जलश्रमशक्ती मंत्रालयाचे सचिव यु.पी.सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पार पडली. यात केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन आर.के.जैन, केंद्रीय जलआयोगाचे अभियंता विजय सरन, संचालक एन.मुखर्जी, पीयुष रंजन आदी उपस्थित होते. तापी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी यांनी या तिन्ही योजनांबाबतचे सादरीकरण केले. तापी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आनंद मोरे, शेळगाव व गिरणा सात बलून बंधारे प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता पी.आर.मोरे, बोदवड परिसर योजना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, सचिन पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.५ हजार ५०६ कोटींचा खर्चशेळगाव बॅरेजच्या ९६१.१० कोटी, गिरणाचे सात बलून बंधारे प्रकल्पाच्या ७८१.३२ कोटी व बोदवड परिसर उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या ३७६३.६० कोटींच्या अशा ५ हजार ५०६ कोटींच्या या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे यांनी या योजना मंजुरीसाठी विशेष परिश्रम घेतले.पायलट प्रोजेक्ट म्हणून मान्यतातापी महामंडळाकडून केंद्रीय जलआयोगाकडे बलून बंधारे (रबर डॅम) बांधण्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होेते. जलआयोगाने २००४ मध्ये या प्रस्तावास मान्यता देऊन एक पायलट प्रोजेक्ट म्हणून सात बंधाऱ्यांना मान्यता दिली होती. त्यानंतर या कामाला गती मिळाली. त्यानुसार गिरणा नदी पात्रात सात ठिकाणी हे प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सिंचन प्रकल्प विभागाकडून तापी पाटबंधारे महामंडळाकडे सादर झाला होता. प्रकल्पाची अंदाजित किंमत ४९६ कोटी १८ लक्ष होती. त्यात आता वाढ होऊन ७८१.३२ कोटी झाली आहे. केंद्राचा हा पायलट प्रोजेक्ट असल्याने त्याचा प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश तापी महामंडळास केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिले होते.कोणी श्रेय घेऊ नये - आमदार चौधरीफेैजपूर : शेळगाव बॅरेजसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेस केंद्रीय जल आयोगाची मुख्य मंजुरी मिळणे आवश्यक होते. मात्र विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली. असे असताना संबंधित अधिकाºयांनी राज्यशासनाकडून ही परवानगी जलआयोगाच्या बैठकीआधी त्यांच्याकडे सादर करण्याबाबत आश्वस्त केल्यावर केंद्रीय जल आयोगाच्या ९ डिसेंबर रोजीच्या अजेंड्यावर शेळगाव प्रकल्पाचा समावेश करण्यात आला व त्यामुळेच ही परवानगी मिळू शकली. त्यामुळे याचे श्रेय कोणी घेऊ नये असे आमदार शिरीष चौधरी यांनी म्हटले आहे.एम.के.अण्णा पाटील यांनी दिला होता प्रस्ताव... चाळीसगाव -देशातील पहिला प्रोजेक्ट म्हणून गिरणा नदीवरील सात बलून बंधारे प्रकल्पाचा प्रस्ताव सर्वात प्रथम १९९८ मध्ये तत्कालीन खासदार व माजी मंत्री एम.के.आण्णा पाटील यांनी केंद्र शासनाकडे सादर केला होता. त्यावेळी शासनाने या प्रकल्पाला तत्वता मंजुरी देऊन सर्व्हे साठी दीड कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता,त्यावेळी या प्रकल्पाचा बजेट १७५ कोटी चा होता. देशातील हा पहिला प्रोजेक्ट असून तो केंद्र शासनाने पायलट प्रोजेक्ट योजनेत समावेश केला होता. याच धर्तीवर देशात सुमारे दोन हजार बंधारे झाले. या बंधाºयामुळे जळगाव, चाळीसगाव, पाचोरा,भडगाव तालुक्यातील ६ हजार ४०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.येथे होणार बंधारेबंधारे होणारा पाणीसाठा (दलघमी)मेहुणबारे ता. चाळीसगाव - ३.९६बहाळ ता. चाळीसगाव - ३.६८१पांढरद.ता.भडगाव - ३.६८१भडगाव ता. भडगाव -२.८३१परधाडे ता. पाचोरा - ४.२४८कुंरंगी ता.पाचोरा - ४.२४८कानळदा ता. जळगाव - २.८३२एकूण साठवण क्षमता - २५.८३१बलून बंधाºयाचा प्रोजेक्ट ऐतिहासिक होता. माझ्या काळात प्रोजेक्ट सादर केल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सर्व्हे व मंजुरी मिळाली होती. केंद्र शासनाच्या पायलट प्रोजेक्ट योजनेत समाविष्ट झाला होता. केंद्रीय जल आयोगाकडून मान्यता मिळाल्याने आनंद आहे.-एम.के.आण्णा पाटील,माजी केंद्रीय मंत्रीगिरणा नदीवर सात बलून बंधारे होणार असल्याने जिल्ह्याचा दृष्टीने फार मोठे यश आहे. हे सातही बंधारे शेतकºयांचा दृष्टीने वरदान ठरणार आहेत. राज्यपालांची विशेष परवानगी घेवून केंद्रीय जल आयोगाकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अखेर या बंधाºयांना मंजुरी मिळाली आहे. शेळगाव बॅरेजचे काम देखील जून पर्यंत पुर्ण होणार आहे. मेगा रिचार्जचे काम राहिले असले तरी केंद्राच्या माध्यमातूनही ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.-गिरीश महाजन, माजी जलसंपदा मंत्री 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव