भुसावळ तालुक्यात तीन हजार शेतकरी अद्यापही बोंडअळी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:46 AM2018-09-12T00:46:53+5:302018-09-12T00:47:48+5:30

Three thousand farmers in Bhusawal taluka are still waiting for subsidy bill | भुसावळ तालुक्यात तीन हजार शेतकरी अद्यापही बोंडअळी अनुदानाच्या प्रतीक्षेत

भुसावळ तालुक्यात तीन हजार शेतकरी अद्यापही बोंडअळी अनुदानाच्या प्रतीक्षेत

googlenewsNext
ठळक मुद्देभुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे ), शिंदी, खडका, साकरी या गावांमध्ये ९५ टक्के नुकसानभरपाई वाटप झाली आहे.उर्वरित गावांमध्ये अद्यापही अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.पहिल्या टप्प्यात सात कोटी रुपये अनुदान झाले वाटप



भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात बोंडअळीच्या अनुदानासाठी अद्यापही तीन हजार शेतकरी वंचित असून, तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने अनुदान त्वरित द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.
भुसावळ तालुक्यात १३ हजार खातेदार आहेत. या खातेदारांना बोंडअळीच्या अनुदानसाठी ११ कोटी तीन लाख ३२ हजार रुपयांची मागणी महसूल विभागाकडून करण्यात आली होती. मात्र तालुक्याला पहिल्या टप्प्यात सात कोटी ३५ लाख ५४ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते.
हे अनुदान आठ हजार खातेदारांना वाटप करण्यात आले आहे. परिणामी अद्यापही तीन हजार खातेदार अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना तीन कोटी ६७ लाख ७८ हजार रुपयांची गरज आहे. शासनाच्या हेडवर केवळ ३८ रुपये शिल्लक आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.








 

Web Title: Three thousand farmers in Bhusawal taluka are still waiting for subsidy bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.