बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने बोदवडचे तीन शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 12:49 IST2019-08-22T12:48:56+5:302019-08-22T12:49:18+5:30
जळगाव/ बोदवड : बदली होऊनही शाळेत हजर न झालेल्या तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. यात एका शिक्षिकेचा समावेश ...

बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने बोदवडचे तीन शिक्षक निलंबित
जळगाव/ बोदवड : बदली होऊनही शाळेत हजर न झालेल्या तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. यात एका शिक्षिकेचा समावेश आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पूनम अजय वाघोदे, ईश्वर जीवन मंडावरे आणि राजाराम महादेव कोकाटे या शिक्षकांचा समावेश आहे.
वाघोदे यांची बोदवड येथील कन्या शाळा क्र. २ मधून साळंशिंगी येथे, मंडावरे यांची येवती येथून शेवगे बुद्रुक आणि राजाराम महादेव कोकाटे यांनी करंजी पाचदेवळी येथून मानमोडी येथे बदली करण्यात आली होती. मात्र ते संबंधित शाळांवर हजर झाले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शेवगे ग्रामस्थांनी बोदवड येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयातच शाळा भरविण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्याची दखल घेत सीईओंनी हा निलंबनाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.