रिक्षाचालकास मारहाण करणाऱ्या तिघा भावंडांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:31 IST2021-02-21T04:31:46+5:302021-02-21T04:31:46+5:30

जळगाव : तालुक्यातील मोहाडी येथील महेंद्र पितांबर ठाकरे (वय ४०) या रिक्षा चालकास लाकडी दांडक्यासह लोखंडी पट्टीने मारहाण ...

Three siblings arrested for beating autorickshaw driver | रिक्षाचालकास मारहाण करणाऱ्या तिघा भावंडांना अटक

रिक्षाचालकास मारहाण करणाऱ्या तिघा भावंडांना अटक

जळगाव : तालुक्यातील मोहाडी येथील महेंद्र पितांबर ठाकरे (वय ४०) या रिक्षा चालकास लाकडी दांडक्यासह लोखंडी पट्टीने मारहाण करणाऱ्या शिवा देवीदास बाविस्कर, ज्ञानेश्‍वर देवीदास बाविस्कर व कुंदन देवीदास बाविस्कर (तिन्ही रा.नागझिरी ता.जळगाव) यांना शनिवारी शहर पोलिसांनी अमळनेरातून अटक केली.

महेंद्र ठाकरे हे १ डिसेंबर रोजी रिक्षा घेऊन जुने बस स्थानकाजवळ आले असता, या ठिकाणी त्यांना शिवा बाविस्कर भेटला. ठाकरे व बाविस्कर दोघांनी सोबत मद्यप्राशन केले. यावेळी बाविस्कर याने ठाकरे यांच्यासमोर त्याची बहीण मीना कोळी यांना शिवीगाळ केली. यानंतर, ठाकरे यांनी शिवा बाविस्कर याच्या कानशिलात लगावली. त्याचा राग येऊन शिवा हा त्याचे भाऊ ज्ञानेश्‍वर व कुंदन यांना घेऊन आला. ज्ञानेश्‍वरसह कुंदन व शिवा या तिघा भावंडांनी लाकडी दंडुका, तसेच लोखंडी पट्टीने महेंद्र ठाकरे यांना मारहाण केली. मारहाणीत ठाकरे हे बेशुद्ध पडले. याच वेळी ठाकरे यांच्या खिशातील पाच हजार रुपये व मोबाइल लांबवून तिघांनी पळ काढला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक भीमराव नंदुरकर यांच्यासह तेजस मराठे, विजय कोळी, बापू मोरे, योगेश सपकाळे यांच्या पथकाने तिघांना अटक केली.

Web Title: Three siblings arrested for beating autorickshaw driver