अज्ञात वाहनाच्या धडकेने वेले गावाजवळ तिघे ठार

By Admin | Updated: June 25, 2017 14:37 IST2017-06-25T14:37:19+5:302017-06-25T14:37:19+5:30

अपघातातील मयतांमध्ये एक इसम व दोन बालकांचा समावेश

Three people were killed near an attack by an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेने वेले गावाजवळ तिघे ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने वेले गावाजवळ तिघे ठार

 ऑनलाईन लोकमत

चोपडा,दि.25 -  तालुक्यातील वेले गावाजवळ रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. त्यात एक इसम व दोन बालकांचा समावेश आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही .
      पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, 24 रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास चोपडा-धरणगाव रस्त्यावरील वेले गावाच्या पुढे रस्त्यावर चालणा:या इसम व त्याच्या सोबतच्या दोन बालकांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात 45 वर्षीय इसमासह त्याचा 5 वर्षाचा मुलगा व आठ वर्षाची मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला. मयतांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांचे मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहे.
    पोलीस पाटील नितीन आबाजीराव पाटील यांच्या खबरीवरून अज्ञात वाहनचालकाविरूद्ध आरोपी विरुद्ध चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत इसम पेहरावावरून आदिवासी असल्याचा अंदाज तपास अधिकारी रामकृष्ण पवार यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Three people were killed near an attack by an unknown vehicle