जळगाव जिल्ह्यात तीन वेगवेगळ््या घटनेत तीन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:32 IST2019-01-26T00:32:12+5:302019-01-26T00:32:41+5:30
प्रशिक्षणार्थी रेल्वे कर्मचारी ठार

जळगाव जिल्ह्यात तीन वेगवेगळ््या घटनेत तीन जण ठार
जळगाव : जिल्ह्यात तीन वेगवेगळ््या घटनांमध्ये तीन जण ठार झाले.
पारोळा तालुक्यातील टिटवी येथे व्याह्याकडे लग्नासाठी आलेल्या शिवाजी परबत पाटील (५५) यांना शिरासमनी टिटवी रस्त्यावर दुचाकीने धडक दिल्याने उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात २४ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास झाला होता. या प्रकरणी मुकुंदा परबत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीचालक नाना संतोष पाटील विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रशिक्षणार्थी रेल्वे कर्मचारी ठार
रेल्वे रुळ ओलांडताना प्रशिक्षणार्थी रेल्वे कर्मचारी प्रवीण किशोर भालेराव (वय २३, रा.कुसुंबा बुद्रूक) यांचा मृत्यू झाला. कुसुंबा बुद्रूक येथे २५ रोजी दुपारी ही घटना घडली.
रूळ ओलांडतांना एकाचा मृत्यू
अमळनेर रेल्वे स्थानकावर रेल्वेरूळ ओलांडताना संजय शंभू बडगुजर ( वय ४७) यांचा रेल्वे गाडखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.
येथील अयोध्या नगरातील रहिवासी संजय बडगुजर हे रूळ ओलांडत असताना मधल्या पटरीवरून मालगाडी जात होती. त्यात ते अडकले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे.