जळगाव जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जण ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 22:18 IST2021-10-01T22:18:34+5:302021-10-01T22:18:52+5:30

बोदवड तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. प

Three people, including a woman, were killed in a lightning strike in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जण ठार 

जळगाव जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जण ठार 

जळगाव : अंगावर वीज पडून महिलेसह तीन जण ठार झाल्याच्या वेगवेगळ्या घटना जळगाव जिल्हयात शुक्रवारी दुपारी घडल्या. 
बोदवड तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. पहिल्या घटनेत पार्वतीबाई गोपाळ भिल (२०, रा. चिंचखेड ता. बोदवड) ह्या ठार तर त्यांच्यासोबत दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना दुपारी चार वाजता घडली. दुसऱ्या घटनेते मनूर बुद्रुक येथे वीज पडून बैल ठार झाला. याशिवाय हमीद रूबाब तडवी (४७, रा. न्हावी ता. यावल)  हे दुपारी ३.३० वाजता जंगलात गुरे चारत होते.  त्यांच्या पायाजवळ वीज कोसळली त्यात ते जागीच ठार झाले.  अजय रुस्तम घोडकी (४०, रा. निमखेडी खुर्द, मुक्ताईनगर) हे शेतात काम करीत असताना  दुपारी २.३० वाजता त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात ते जागीच गतप्राण झाले.

Web Title: Three people, including a woman, were killed in a lightning strike in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव