सराफा हल्लाप्रकरणी पहूरच्या आणखी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:47 IST2019-03-01T22:47:36+5:302019-03-01T22:47:54+5:30
अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच

सराफा हल्लाप्रकरणी पहूरच्या आणखी तिघांना अटक
पहूर, ता. जामनेर : वाकोद येथील रहिवासी, सराफा व्यावसायिक कमलेश छाजेड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी पहूर येथील आणखी तीन युवकांना अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच झाली आहे.
कमलेश छाजेड यांच्यावर जानेवारी महिन्यात हल्ला करून ९५ हजाराचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी प्रदीप रायदास पाटील व रोहित दीपक पाटील यांना अटक करण्यात आली होती. पोलीस तपासात पहूर पेठ मधील रहिवासी सागर लक्ष्मण बारी (२४), अकिल भिकन पठाण, रा. शिवनगर पहूर व जावेद सरदार तडवी, रा. नवी सांगवी या तीन युवकांचे नाव समोर आले. यातील सागर बारी याला गुरुवारी रात्री अटक केली व अकील पठाण व जावेद तडवी यांना शुक्रवारी दुपारी ताब्यात घेऊन चौकशी नंतर संध्याकाळी अटक केली आहे. प्रदिप पाटील व रोहित पाटील यांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपल्याने पुन्हा जामनेर न्यायालयात हजर केले असता या दोघांसह सागर बारी याला ४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पहूर पोलिसात युवकांविरूध्द गुन्हा दाखल आहे.