जळगावमध्ये अज्ञात वाहनाने तीन परप्रांतीयांना चिरडले
By Ajay.patil | Updated: March 11, 2025 13:02 IST2025-03-11T13:02:38+5:302025-03-11T13:02:46+5:30
जळगाव खुर्द गावाजवडील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू आहे. या ठिकाणी परप्रांतीय मजूर काम करत असतात.

जळगावमध्ये अज्ञात वाहनाने तीन परप्रांतीयांना चिरडले
जळगाव - तालुक्यातील नशिराबाद गावजवळील जळगाव खुर्द गावाच्या पुलाजवळ झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने एकाच वेळी चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव खुर्द गावाजवडील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू आहे. या ठिकाणी परप्रांतीय मजूर काम करत असतात. मध्यरात्री हे परप्रांतीय मजूर झोपलेले असताना अंधारात काही न दिसल्याने अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडले आहे. हे घटना मंगळवारी 11 मार्च रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.