जळगावातील गणेश कॉलनी भागात तीन लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:09 IST2017-10-17T13:04:53+5:302017-10-17T13:09:01+5:30

पती पत्नी खासगी कंपनीत नोकरीस

Three lakhs of homicide in Jalgaon | जळगावातील गणेश कॉलनी भागात तीन लाखांची घरफोडी

जळगावातील गणेश कॉलनी भागात तीन लाखांची घरफोडी

ठळक मुद्देचोरटय़ांचे धाडस वाढलेचोरीबाबतची तक्रार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17 - शहरातील गणेश कॉलनीत सुखकर्ता अपार्टमेंटमध्ये तीन लाखांची घरफोडी झाल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी समोर आला आह़े कुटुंबांतील पती-पत्नी कंपनीत नोकरीला असून कामाहून परतल्यावर हा प्रकार उघड झाला़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह़े
गणेश कॉलनीतील सुखकर्ता अपार्टमेंटच्या बी बिंगच्या तळमजल्यावर संजय देवेंद्र वढावकर हे पत्नी अनिता यांच्यासह राहतात. दोन्ही पती पत्नी खासगी कंपनीत नोकरीस आहेत. 
सोमवारी सकाळी 8़30 वाजता संजय वढावकर तर 10़30 वाजता त्यांच्या पत्नी  कुलूप लावून घराबाहेर पडल्या़ दुपारी 4़30 वाजता संजय वढावकर हे घरी आले असता घराचा दरवाजा उघडाच होता. त्यामुये ते थेट घरात शिरले व पत्नीला आवाज दिला, परंतू प्रतिसादच मिळाला नाही. यानंतर  ते किचन आणि  बेडरुममध्ये गेले असता त्यांना कपाट उघडे असलेले दिसले. याचबरोबर त्यातील सामान बाहेर अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. 

वढावकर यांच्या घराला लाकडी दरवाजासह लोखंडी गेट देखील आहे. परंतू सोमवारी त्यांनी लोखंडी गेटला कुलूप लावलेले नव्हते. चोरटय़ांनी कटरच्या सहाय्याने घराच्या दरवाजाचा कडी, कोयंडा तोडून प्रवेश केला होता. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने कपाटाचे ड्रावर उघडून सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे व रोख रक्कम असा सुमारे 3 लाख रूपयांचा ऐवज लंपास केला़ घटना उघड झाल्यावर वढावकर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून या चोरीबाबतची तक्रार दिली़

Web Title: Three lakhs of homicide in Jalgaon