चाळीसगावला तीन लाखाचे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:40 IST2018-02-12T12:40:34+5:302018-02-12T12:40:56+5:30

१४ सोन्याच्या अंगठ्या

Three Lakhs of gold lapsas in Chalisgaon | चाळीसगावला तीन लाखाचे सोने लंपास

चाळीसगावला तीन लाखाचे सोने लंपास

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. १२ - शहरातील धुळे रोड लगतच्या एका लॉन्स मधून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ९७ हजार रुपये किंमतीच्या १४ सोन्याच्या अंगठ्या पर्स मधून लंपास केला. ही घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली.
शिवप्रताप कॉलनी देवपुर रोड धुळे येथील निवृत्त प्राध्यापक धनराज राघो पाटील (वय ६८) हे पत्नीसह विराम लॉन्स मध्ये विवाह सोहळ्यासाठी आले होते. ते रुम क्र. ११० मध्ये थांबले होते. दुपारी एक वाजता अज्ञात चोरट्यांनी पर्स मधील दोन लाख ९७ हजार रुपये किंमतीच्या १४ सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली. खबरीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला असून पीएसआय रमेश मानकर पुढील तपास करीत आहे.

Web Title: Three Lakhs of gold lapsas in Chalisgaon