एरंडोल/जळगाव : विवाह समारंभासाठी ठाणे येथून मारुळ, ता. यावल येथे येत असलेल्या वºहाडींच्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने तीन जण जागीच ठार, तर दहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल तालुक्यातील पातरखेडे गावाजवळ घडली. आरीफ मेहबूब मलीक (५०, रा. शादी महल हॉलसमोर, मुंब्रा, ठाणे), फिरोज खान रशीद खान (३१, रा. जिलानी हाऊस, राबोडी, ठाणे) व ताहिरा नजीर सैय्यद (५०, रा. शाईन अपार्टमेंट, दुसरा मजला, राबोडी, ठाणे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ठाणे येथील मलीक व सैय्यद परिवारातील काही सदस्य हे नातेवाईकाच्या विवाह समारंभासाठी (एम.एच ०४ जीपी २७७७) क्रमांकाच्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनाने यावल तालुक्यातील मारूळ येथे येत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल तालुक्यातील पातरखेडे गावाजवळ त्यांच्या वाहनाला समोरून भरधाव येणाºया (ओ.आर १५ एम ०७३९) क्रमांकाच्या ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात वºहाडाच्या वाहनामधील आरीफ मलीक, फिरोज खान व ताहिरा सैय्यद हे तिघे जण जागीच ठार झाले. तर कलीम याकूब मलीक (४८), स्वालेहा कलीम मलीक (वय ४३), मकसूद अली सैय्यद (वय ४४), आलमबी शेख (वय ४५), निसारअली सैय्यद (वय ७२), सई निसार अली (वय ६७), तेहसील मलीक (वय ५५), इस्लामोद्दीन सय्यद (वय ५५), रशिदाबी (वय ६०) व सोनीदाबी (वय ६०) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एरंडोलजवळ व-हाडाच्या वाहनाला झालेल्या अपघातात तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:34 IST
विवाह समारंभासाठी ठाणे येथून मारुळ, ता. यावल येथे येत असलेल्या वºहाडींच्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने तीन जण जागीच ठार, तर दहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल तालुक्यातील पातरखेडे गावाजवळ घडली.
एरंडोलजवळ व-हाडाच्या वाहनाला झालेल्या अपघातात तीन ठार
ठळक मुद्देअपघातात झाले दहा प्रवासी जखमीराष्ट्रीय महामार्गावर पातरखेडेजवळ अपघातमारूळ येथे जात असताना झाला अपघात