चाळीसगाव परिसरात वीज पडून तीन जण ठार; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2025 19:58 IST2025-06-15T19:58:42+5:302025-06-15T19:58:56+5:30

दशरथ याचा शालक समाधान हा बहिणीला भेटण्यासाठी कोंगानगर येथे आला होता. तोही मेहुण्यासोबत शेतात गेला होता

Three killed in lightning strike in Chalisgaon area; Two children among the dead | चाळीसगाव परिसरात वीज पडून तीन जण ठार; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

चाळीसगाव परिसरात वीज पडून तीन जण ठार; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

जिजाबराव वाघ

चाळीसगाव (जि. जळगाव) : वादळी पावसात शेतात वीज पडून मेहुणा आणि शालकासह तीन जण ठार तर एक जण जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना कोंगानगर  ता. चाळीसगाव येथे रविवारी दुपारी २ वाजता घडली. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. 

दशरथ उदल पवार (२४, रा. कोंगानगर), त्याचा शालक समाधान प्रकाश राठोड (९, रा. जेहूर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) आणि पुतण्या दिलीप पवार (१४, रा. कोंगानगर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.  या घटनेत  दिलीप उदल पवार (३५) हे जखमी झाले आहेत. दशरथ पवार याचे ३१ मे २०२५ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर १५ दिवशी ही घटना घडली आहे.  दशरथ याचा शालक समाधान हा बहिणीला भेटण्यासाठी कोंगानगर येथे आला होता. तोही मेहुण्यासोबत शेतात गेला होता. त्याचवेळी वीज पडून तीनही जणांचा मृत्यू झाला

Web Title: Three killed in lightning strike in Chalisgaon area; Two children among the dead