सलग दुसऱ्या दिवशी त्रिशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:31 IST2020-07-17T21:31:10+5:302020-07-17T21:31:21+5:30
जळगाव : कोरोना रुग्णांच्या संख्येने सलग दुसºया दिवशी त्रिशतकाचा आकडा ओलांडला असून शुक्रवारी एका दिवसात ३०५ रुग्ण आढळून आलेले ...

सलग दुसऱ्या दिवशी त्रिशतक
जळगाव : कोरोना रुग्णांच्या संख्येने सलग दुसºया दिवशी त्रिशतकाचा आकडा ओलांडला असून शुक्रवारी एका दिवसात ३०५ रुग्ण आढळून आलेले आहेत़ दरम्यान, एकाच दिवसात १३ मृत्यूची नोंद झाल्याने चिंतेचे वातावरण आहे़
शुक्रवारी १४४३ अहवाल प्राप्त झाले़ त्यात १०६१ अहवाल निगेटीव्ह आले़ बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी १८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे़ जिल्ह्यात भुसावळ तालुका ४, जळगाव शहरातील १, तालुकयातील २ यासह चाळीसगाव, जामनेर, एरंडोल तालुका प्रत्येकी १ तसेच चाळीसगाव व यावल तालुक्यातील प्रत्येकी २ बाधितांच समावेश आहे़ यात जळगाव शहरातील बाधित रुग्णाचे वय हे ४० वर्ष होते़ बाकी अन्य सर्व रुग्ण हे ५० वर्षावरील होते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़