मेहुणबारे येथील आगीत तीन घरे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:23 IST2018-11-26T23:22:11+5:302018-11-26T23:23:35+5:30

मेहुणबारे येथे सोमवार २६ रोजी नवे गावातील इंदिरा नगर मध्ये आग लागून ३ घरांचे नुकसान झाले.

Three houses of fire in Mehunabare fire | मेहुणबारे येथील आगीत तीन घरे खाक

मेहुणबारे येथील आगीत तीन घरे खाक

ठळक मुद्देआगीचे कारण झाले नाही स्पष्टदोन घरातील संसारपयोगी साहित्य खाकअंगणातील गुरे ढोरे वाचविण्यात यश

मेहुणबारे ता. चाळीसगाव : मेहुणबारे येथे सोमवार २६ रोजी नवे गावातील इंदिरा नगर मध्ये आग लागून ३ घरांचे नुकसान झाले.
सोमवारी दुपारी १२.३० वा आग लागण्यास सुरुवात झाली. काही क्षणात या आगीने २ ते ३ घरांना वेढा घातला. त्यात कृष्णा नामदेव कोळी , हरी दौलत कोळी, राजेंद्र हरी कोळी यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूंसह, रोख रकमेसह, सोने-चांदीचे दागिने जाळून खाक झाले, तर वाल्मिक साहेबराव कोळी यांचे घराबाहेरील पाण्याची टाकी, पत्रे असे १०००० रुपयांचे नुकसान झाले. घराबाहेरील अंगणात गुरे ढोरे आजुबाजुच्या लोकांनी त्वरित सोडून त्यांचे जीव वाचविला. आगीच्या घटनेचा पंचनामा तलाठी चव्हाण यांनी केला. याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशनला नोद करण्यात आली आहे.

Web Title: Three houses of fire in Mehunabare fire