तीन दिवसानंतरही वाहून गेलेला तरूण सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 09:01 PM2018-08-19T21:01:59+5:302018-08-19T21:03:22+5:30

लक्ष्मीनारायण नगरातील नाल्यात पाय घसरून वाहून गेलेला हेमंत अरूण वाणी (वय-३८) हा तरूण तीन दिवसानंतरही अद्याप सापडला नाही़

Three days later, the youngster found | तीन दिवसानंतरही वाहून गेलेला तरूण सापडेना

तीन दिवसानंतरही वाहून गेलेला तरूण सापडेना

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाकडून शोधकार्य सुरुचहातेड नाल्याची आपत्ती व्यवस्थापनाकडून पाहणीपाच किलोमिटरपर्यंत नाल्यात चालून घेतला शोधचोपडा तालुक्यातील तहसिलदारांना सुचना

जळगाव : लक्ष्मीनारायण नगरातील नाल्यात पाय घसरून वाहून गेलेला हेमंत अरूण वाणी (वय-३८) हा तरूण तीन दिवसानंतरही अद्याप सापडला नाही़  मनपा कर्मचाºयांसह आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाºयांच्या पथकाने दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी तरूणाचा शोध घेतला़
गुरूवारी जोरदार पावसामुळे लक्ष्मीनारायण नगरातील नाल्याला पुर आला होता़ पुर आल्यामुळे हेमंत यांनी चार ते पाच विद्यार्थ्यांसह महिलांची मदत करून त्यांना नाल्यावरील पुलावरुन जाण्यास मदत केली़ तसेच एका गायीसही वाचविले.
याठिकाणी असताना याच दरम्यान अचानक त्यांचा पाय घसरून तो नाल्यात पडून वाहून गेला. गुरूवारी दुपारी ही घटना घडली़ त्या दिवसापासून हेमंत यांच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतू, हेमंत हे कोठेही मिळून आले नाही़ शुक्रवारी मनपा कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने घटनेच्या ठिकणापासून ते पाच किलोमीटरपर्यंत नाल्यात चालून शोध कार्य सुरू केले मात्र, काहीही आढळून आले नाही़
शनिवारी चोपडा तालुक्यातील तहसिलदारांना शोध कार्य सुरू करण्याबाबत सुचना करण्यात आली असल्याची माहिती मिळते़ त्यानुसार ज्या ठिकाणी हा नाला जातो त्या-त्या ठिकाणाची पाहणी करण्याची व हेमंत यांना शोधण्याबाबत त्यांना सुचना केली आहे़ तसेच रविवारी देखील हेमंत यास शोधण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Three days later, the youngster found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.