शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्ण दगावले, ट्रॉमा केअर सेंटरमधील घटना; व्हेंटिलेटर धूळ खात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 7:12 AM

या आजारांमध्ये कुठल्याही प्रकारची लपवालपवी न करता सुरुवातीलाच निदान केल्यास जास्त त्रास होत नाही. बाधित रुग्णांनी त्वरित कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावे. वेळेवर उपचार करावा, अशी अपेक्षा ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर चौधरी यांनी व्यक्त केली.

भुसावळ (जळगाव): राज्यात कोरोनाची दुसरी लाट म्हणावी अशी भीषण परिस्थिती असताना भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील साकेगाव हद्दीत असलेल्या ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये  व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांत दोन पुरुष व एका महिलेचा समावेश असून एक रुग्ण बुधवारी (१७ मार्च) रात्री तर अन्य दोघे गुरुवारी पहाटे दगावले. सात महिन्यांपूर्वीच रुग्णालयाला १० व्हेेंटिलेटर प्राप्त होऊनही ते धूळ खात पडून असल्याने रुग्णांना प्राणास मुकावे लागले.बुधवारी रात्री बोदवड तालुक्यातील ६० वर्षीय पुरुषास गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.  या रुग्णास विविध रुग्णालयांत  नेऊनसुद्धा    व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला आणण्यात आले.  मात्र, तेथेही व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही.  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय १८ रोजी सकाळी कासोदा (ता. एरंडोल) येथील ६० वर्षीय पुरुष, न्हावी (ता. यावल) येथील ६० वर्षीय महिला यांनाही व्हेंटिलेटरची नितांत आवश्यकता असताना वेळेवर  उपलब्ध झाला नाही, तांत्रिक अडचणी याशिवाय अत्यंत कमी झालेली ऑक्सिजन पातळी व  उपचाराला झालेला उशीर यामुळे मृत्यू ओढवला.

डाॅक्टर म्हणतात... या आजारांमध्ये कुठल्याही प्रकारची लपवालपवी न करता सुरुवातीलाच निदान केल्यास जास्त त्रास होत नाही. बाधित रुग्णांनी त्वरित कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावे. वेळेवर उपचार करावा, अशी अपेक्षा ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर चौधरी यांनी व्यक्त केली.

क्षमतेपेक्षा अधिक कोरोना रुग्णया ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी अवघे ४० बेड उपलब्ध आहेत. मात्र, यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह  रुग्णांना या ठिकाणी भरती केले आहे. या रुग्णालयात पीएम केअर निधीतून सात महिन्यांपूर्वी १० व्हेेंटिलेटर देण्यात आले होते. या ठिकाणी पुरेसे डाॅक्टर व  कर्मचारी नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहेत. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस