जळगाव जिल्ह्यात आढळले तीन कोरोना बाधित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:05 IST2020-05-15T18:04:15+5:302020-05-15T18:05:51+5:30

जळगाव - जिल्ह्यात जळगाव , भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 52 कोरोना संशयित व्यक्तीचे स्वॅब नमुना तपासणी ...

Three corona infected patients were found in Jalgaon district today | जळगाव जिल्ह्यात आढळले तीन कोरोना बाधित रूग्ण

जळगाव जिल्ह्यात आढळले तीन कोरोना बाधित रूग्ण


जळगाव - जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 52 कोरोना संशयित व्यक्तीचे स्वॅब नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 49 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील माता आश्रम येथील एक, अमळनेर येथील मराठे गल्लीतील एक, आणि पाचोरा येथील एक अशा तीन रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 235 इतकी झाली असून त्यापैकी पस्तीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर अठ्ठावीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Web Title: Three corona infected patients were found in Jalgaon district today