अमळनेरात आचारसंहिता भंगाचे तीन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 09:43 PM2019-04-23T21:43:18+5:302019-04-23T21:46:35+5:30

मतदान केंद्राच्या दोनशे मीटरच्या आत राष्टवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, रिपाई व मित्र पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा फोटो तसेच राष्टवादी पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह छापून ओळख चिठ्ठी वाटप केल्याचा प्रकार अमळनेरात घडला. या प्रकरणी सात जणांवर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Three cases of violation of Code of Conduct have been filed in Amalner | अमळनेरात आचारसंहिता भंगाचे तीन गुन्हे दाखल

अमळनेरात आचारसंहिता भंगाचे तीन गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देसात जणांवर कारवाई राष्टवादीच्या उमेदवाराचा फोटो असलेल्या चिठ्याचा वापर आचारसंहिता कक्ष प्रमुखाने दिली फिर्याद

जळगाव : मतदान केंद्राच्या दोनशे मीटरच्या आत राष्टवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, रिपाई व मित्र पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा फोटो तसेच राष्टवादी पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह छापून ओळख चिठ्ठी वाटप केल्याचा प्रकार अमळनेरात घडला. या प्रकरणी सात जणांवर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजयकुमार कल्याण नष्टे (२७) यांनी तीन फिर्याद दिल्या आहेत. उमेश सतीष सोनार (२६), पठाण काशिफ खान इस्माईल (१८ दोघे रा. जोशी पुरा, अमळनेर)  हे दोघं अमळनेर शहरातील बुथ क्रमांक १६६ पंचायत समितीजवळ दोनशे मीटरच्या आत गुलाबराव देवकर यांचा फोटो व घड्याळ चिन्ह असलेल्या चिठ्या वाटप करताना आढळून आले. दुसºया फिर्यादीत बुथ क्रमांक १८३ इंदिरा गांधी विद्यालयाच्या केंद्राजवळ दोनशे मीटरच्या आत असाच प्रकार करताना चेतन नामदेव मिस्त्री (२५), निलेश धनराज चौधरी (२३) व सागर महेंद्र बडगुजर (१८) तिन्ही रा.अमळनेर तर तिसºया फिर्यादीत मोहित विजय सोनवणे (१८) व मुकेश रमेश पारधी (१८) या दोघांनी पंचायत समितीजवळ दोनशे मीटरच्या आत बूथ लावून मतदार यादी व नावाच्या चिठ्ठ्या वाटप केल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Three cases of violation of Code of Conduct have been filed in Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.