राजेश पवार यांना कॅण्डीक व वेडींग फोटोग्राफीचे तीन पुरस्कार

By Admin | Updated: April 20, 2017 15:20 IST2017-04-20T15:20:00+5:302017-04-20T15:20:00+5:30

छायाचित्र स्पर्धेत पिंपळे सौदागर येथील छायाचित्रकार राजेश पवार यांनी दोन गटात तीन बक्षीस मिळवित हॅट्ट्रिक केली आहे.

Three Awards for Candice and Wedding Photography by Rajesh Pawar | राजेश पवार यांना कॅण्डीक व वेडींग फोटोग्राफीचे तीन पुरस्कार

राजेश पवार यांना कॅण्डीक व वेडींग फोटोग्राफीचे तीन पुरस्कार

 जळगाव, दि.20- फोटोग्राफर्स व व्हिडिओग्राफर्स असोसिएशन,पुणे या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेत पिंपळे सौदागर येथील छायाचित्रकार राजेश पवार यांनी दोन गटात तीन बक्षीस मिळवित हॅट्ट्रिक केली आहे.

पी.पी.व्ही.ए.ही पुणे व परिसरातील फोटोग्राफर्सची संस्था आहे. या संस्थेचे 300 फोटोग्राफर्स सदस्य आहेत. फोटोग्राफर यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या व्यवसायातील अडचणी सोडविण्याचे काम ही संस्था करते. संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त 27 ते 29 मार्च दरम्यान छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली. महापौर मुक्ता टिळक तसेच एफटीआयमधील छायाचित्र विभागाचे प्रमुख ए.के.कनाल यांच्या हस्ते पवार यांना पारितोषिक देण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम झाला. पवार यांना कॅन्डिड फोटोग्राफी या गटात दोन व वेडिंग फोटोग्राफी या गटात एक अशी तीन पारितोषिके मिळाली आहेत.

Web Title: Three Awards for Candice and Wedding Photography by Rajesh Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.