Threats of illegal wood throwing in the fields | शेतात अवैध लाकूड टाकण्याची धमकी

शेतात अवैध लाकूड टाकण्याची धमकी

ठळक मुद्देयावल पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखलसंशयित परसाळे येथील

यावल, जि.जळगाव : शेतात अवैध लाकूड टाकून फसविण्याची धमकी देवून ९३ हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुबारक नबाब तडवी याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कोळवद येथील अरुण टोपा महाजन या शेतकऱ्यास तुझ्या शेतात अवैध लाकूड टाकून तुला वनविभागाच्या जाळयात फसविन, अशी धमकी परसाळे येथील संशयित आरोपी मुबारक नबाब तडवी याने दिली. वेळोवेळी महाजन यांच्याकडून वेळोवेळी मागणी केल्यानुसार त्यास ९३ हजार रुपये दिले. त्याने पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. तेव्हा घाबरलेल्या महाजन यांनी हा प्रकार आपल्या भावास सांगितला. तेव्हा दोघा भावांनी शनिवारी येथील पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार महेबूब तडवी, शिकंदर तडवी करीत आहे.

Web Title: Threats of illegal wood throwing in the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.