जळगावात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:57 IST2018-08-01T17:52:49+5:302018-08-01T17:57:47+5:30
राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रिया अमोल कोल्हे (वय २३, रा.ईश्वर कॉलनी,जळगाव) यांना अश्लिल शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा प्रकार ईश्वर कॉलनीत घडला.

जळगावात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धमकी
ठळक मुद्देजळगावात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धमकीचारचाकीमधून जेवण आणल्याचा विचारला होता जाबऔद्योगिक वसाहत पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : सेंट लॉरेन्स शाळेच्या मतदान केंद्रात चार चाकीमधून जेवण तसेच भांडे नेत असताना त्याचा जाब विचारणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रिया अमोल कोल्हे (वय २३, रा.ईश्वर कॉलनी,जळगाव) यांना अश्लिल शिवीगाळ करुन हात पिरगळत, उद्याची निवडणून होऊ दे तुला व तुझ्या नातेवाईकांना पाहून घेवू अशी धमकी दिल्याचा प्रकार ईश्वर कॉलनीत घडला. याप्रकरणी बुधवारी पहाटे कुंदन काळे, चंद्रशेखर अत्तरदे, दीपक चौधरी, दिनेश अत्तरदे व इतर ७ ते ८ जण यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.