शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आत्महत्या करण्यासाठी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहचतात तरी या सरकारला संवेदना नाही : खासदार अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:19 IST

शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण म्हणाले...हे तर मस्तवाल सरकारराज्यघटनेतील बदलाचा डाव हाणून पाडूसरकार कसं चालवाव हे त्यांना कळत नाही

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२४ : शेतकरी, शेतमजुर यांची महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हा काँग्रेसचे व्हीजन २०१९ या शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतराव पुरके, जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपा सरकार घोषणा करीत असताना अंमलबजावणी मात्र करीत नाही. या सरकारला कधी खाली खेचू या भूमिकेत सर्वसामान्य जनता आहे. उद्योग आणि आर्थिक यशाचे शिखरे गाठणारा महाराष्ट्र आज शेतकरी आत्महत्येत उच्चांक गाठत आहे. महाविद्यालयातून प्रत्येक वर्षाला अनेक विद्यार्थी बाहेर पडत आहेत. मात्र हे सरकार त्यांना रोजगार देण्यासाठी अपयशी ठरले आहे.सरकारच्या विरोधात बोलल्यास तुमच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी हे सरकार करीत असते. सध्या राज्यात अघोषित आणिबाणी सारखी स्थिती आहे. यासाºयात काँग्रेसची भूमिका काय? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.हे तर मस्तवाल सरकारगेल्या वेळी काँग्रेसची सत्ता गेली त्यामुळे निराश नाही. सत्ता ही येत-जात राहते. मात्र बहुमताच्या बळावर आम्ही काहीही करू ही मस्तवाल भूमिका या सरकारची आहे. त्यामुळे या सरकारविरोधात संघर्ष करण्याची आवश्यकता आहे.राज्यघटनेतील बदलाचा डाव हाणून पाडूभाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशाची राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते आतापासून चाचपणी करीत आहेत. राज्यघटनेला धक्का लावण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.सरकार कसं चालवाव हे त्यांना कळत नाहीभाजपा व शिवसेनेला सत्तेत येऊन तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र अजून त्यांना सरकार कसे चालवावे हे समजत नाही.

टॅग्स :JalgaonजळगावAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस