‘त्या’शंभर कोटींमधून अद्याप एक ‘दमडी’च्याही कामाला सुरुवात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:43 PM2019-11-15T23:43:07+5:302019-11-15T23:43:36+5:30

जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत दीड वर्षापुर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांचा निधीतून अद्यापही दमडीच्या कामाला देखील सुरुवात झालेली नाही. ...

Of those 'one hundred crores', not a single 'coward' has begun | ‘त्या’शंभर कोटींमधून अद्याप एक ‘दमडी’च्याही कामाला सुरुवात नाही

‘त्या’शंभर कोटींमधून अद्याप एक ‘दमडी’च्याही कामाला सुरुवात नाही

Next

जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत दीड वर्षापुर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांचा निधीतून अद्यापही दमडीच्या कामाला देखील सुरुवात झालेली नाही. वर्षभरात शहराचा चेहरा- मोहरा बदलविणाच्या दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून अद्याप शासनाने दिलेल्या निधीचेही नियोजन करता आलेले नाही. दोन महिन्यांपुर्वी मंजूर झालेल्या ४२ कोटींच्या कामांचीही निविदा अद्याप काढण्यात आली नसल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.
१६ आॅगस्ट २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोथ्थान अंतर्गत शहरासाठी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. महापालिकेत सत्ता आल्यानंतर महिनाभरातच शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी आणल्यामुळे मनपातील सत्ताधाºयांनी आश्वासन पाडल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, १०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्यावर देखील शहरातील नागरिकांच्या समस्या आहेत त्या आजही कायम आहेत. या निधीतून रस्त्यांचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र, काम सुरु न झाल्याने सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत.
दरम्यान, याबाबत महापालिकेत गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व मनपा अधिकाºयांचा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव ही बैठक होवू शकली नाही. दोन दिवसात याबाबत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिली. स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी देखील याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना निविदा प्रक्रियेबाबत माहिती विचारली होती. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी नगरोथ्थानमधील कामांची छाननी प्रक्रिया सुरु असल्याने निविदा प्रक्रिया थांबली होती. मात्र, लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले असल्याची माहिती स्थायी समिती सभापतींनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले आहे काम
-नगरोथ्थान मधून १०० कोटी पैकी ४२ कोटी रुपयांचा निधीतून होणाºया कामांना ८ आॅगस्ट रोजी शासनाकडून मंजूरी मिळाली होती. तसेच शासनाने या कामे मनपाकडून न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचाही सूचना दिल्या होत्या.
- सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखील तीन महिन्यात साधी निविदा प्रक्रिया देखील राबवता आलेली नाही. त्यात २१ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने काम थांबले असावे मात्र, पूर्ण आॅगस्ट महिना व त्यानंतर आता नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यावर देखील निविदा प्रक्रिया काढण्यात आलेली नाही. त्यामुळे कामे रखडली आहे.

अजून चार महिने तरी खड्डयांपासून सुटका नाही ?
-४२ कोटी रुपयांच्या निधीतून काही यापैकी ४२ कोटी रुपयांमधून १३० कामांना मंजूरी मिळाली आहे. त्यात १६ कोटी रुपयांमधून शिवाजी नगर उड्डाणपूल ते दुध फेडरेशनपर्यंतचा रस्ता, कालींका माता मंदिर ते जुना खेडी रस्त्यापर्यंतचा २४ मीटरच रुंद रस्ता तयार करण्यासह दुभाजक तयार करण्यात येणार आहे.
-रायसोनीनगर जकातनाका ते मनपा हद्दीपर्यंतचा १८ मीटरच्या डीपीरोडचे डांबरीकरण, गणेश कॉलनी चौक ते कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौक ते वाघ नगर, जि.प.चौक ते नेरीनाका स्मशानभूमीपर्यंतचा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामांमुळे शहरातील काही भागातील नागरिकांना खड्डयांपासून दिलासा मिळू शकतो. मात्र, अद्याप या कामांसाठी निविदा देखील काढण्यात आली नसल्याने या कामांना केव्हा सुरुवात होईल आणि केव्हा रस्त्यांचे भाग्य उजाडणार ? याचा प्रतीक्षेत सामान्य जळगावकर आहेत.

Web Title: Of those 'one hundred crores', not a single 'coward' has begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.