शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

जळगाव: यंदाचा उन्हाळा शासकीय अधिकाऱ्यांना फोडणार घाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 20:08 IST

 माहिती अधिकाराच्या झळा.. ‘एसी’ वापरण्यासाठी एकाकडेही नाही निकषाची ‘खूर्ची’

कुंदन पाटील/जळगाव: शासकीय दालनात ‘एअर कंडीशनर’ वापरासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वेतनश्रेणीनुसार परवानगी दिली. त्या वेतनश्रेणीनुसार जिल्ह्यातील एकही अधिकारी दालनात ‘एसी’ बसविण्यासाठी पात्र नाही. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांच्या दालनातील ‘एसी’ काढण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा शासकीय अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फोडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

दीपक गुप्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह काही जणांच्या वेतनश्रेणीची  आणि ‘एअर कंडीशनर’ वापरण्यासाठी कुणाला परवानगी आहे, याविषयी माहिती मिळविली. त्यानुसार सातव्या वेतन आयोगाच्या वेतन संरचनेनुसार एस-३० वेतनश्रेणी १ लाख ४४ हजार ते २ लाख १८ हजार व त्यापेक्षा जास्त  वेतन श्रेणी असणारे अधिकारी शासकीय कार्यालयातील दालनात ‘एसी’ बसवू शकतात, असा निर्णय दि.२५ मे २०२२ रोजी घेतला होता. मात्र जिल्हाधिकारी अमन मित्तल (वेतन श्रेणी एस-११, ६७ ७०० -२०८७००), अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन (वेतन श्रेणी एस-२५, ७८८००-२०९२००), निवासी उपजिल्हाधिकारी (एस-२०, ६५१००-१७७५००) यांना ‘एसी’ बसविण्याचा अधिकार नाही.

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी,  डीवायएसपींसह शल्यचिकित्सक, मनपा आयुक्त, सा.बां.विभागाच्या अधीक्षक अभियंता, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह कुणीही ‘एसी’चा वापर करण्यासाठी निकषात बसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार शल्यचिकित्सकांसह काही अधिकाऱ्यांनी ‘एसी’ काढून घेतले आहेत. अन्य अधिकारी जनतेच्या पैशांवर ‘एसी’ची हवा खात असून त्यापोटी भरमसाठ पैसा खर्ची पडत आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त, प्रधान सचीव व मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात रितसर तक्रार केली आहे. तसेच ही सेवा खंडित करुन जनतेचा पैसा वाचवावा, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव