पाच तासाच्या अंतरात तिसरा खून; भुसावळात गुन्हेगाराची हत्या
By चुडामण.बोरसे | Updated: September 2, 2023 10:41 IST2023-09-02T10:40:56+5:302023-09-02T10:41:30+5:30
भुसावळ शहर पुन्हा हादरले आहे.

पाच तासाच्या अंतरात तिसरा खून; भुसावळात गुन्हेगाराची हत्या
भुसावळ (जि. जळगाव) : भुसावळ येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हेगार निखिल राजपूत (४०) याचा खून करण्यात आल्याची घटना घडली. पाच तासाच्या अंतरात हा तिसरा खून आहे. यामुळे भुसावळ शहर पुन्हा हादरले आहे. गुन्हेगार असलेला निखिल याच्यावर एमपीडीएची कारवाई प्रस्तावित होती.
दरम्यान भुसावळनजीक असलेल्या कंडारीत शुक्रवारी रात्री १०:३० ते ११वाजेच्या दरम्यान जुना वाद उफाळून आला. यात शांताराम भोलानाथ साळुंखे(२८) व राकेश भोलानाथ साळुंखे (३३, दोघे रा. कंडारी) या सख्ख्या भावांचा खून झाला होता. यानंतर काही तासातच गुन्हेगार निखिलच्या खुनाची घटना उघडकीस आली.