शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

थर्ड आय : मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:08 IST

साहित्यिक अशोक कौतिक कोळी यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूक

रवींद्र मोराणकरजळगाव : आपल्या मतदारसंघातील प्रतिष्ठित- नावाजलेल्या कलावंत, साहित्यिक, आर्टिस्ट, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात. त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्र्चिले जायला हवे. याचा आढावा घेणारी मुलाखत.एक कलावंत म्हणून, तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?सध्याची लोकसभा निवडणूक ही मला घाई-गडबडीची, राजकीय पक्षांच्या लुटूपुटूची लढाई वाटते. त्यात ठरवून मतदारांची दिशाभूल सुरू आहे का काय, असे वाटते. असंबद्ध मुद्दे व वैयक्तिक टीकाटिपणी करून मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताना दिसताहेत. त्यामुळे मतदारांची करमणूक होताना दिसत आहे.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवे?याऐवजी निवडणुकीत देशहिताचे व समाजहिताचे मुद्दे असायला हवेत. ज्यातून जनतेचे हित, देशाचा विकास, देशातील समाजाचे उन्नत प्रतिबिंब उमटायला हवे व निकोप स्पर्धात्मक वातावरण तयार व्हायला हवे. समाजाच्या व देशाच्या आजच्या आशा-आकांक्षा काय आहेत, हे खरं तर निवडणुकीतील मुद्यांमधून डोकायला हवे. ध्येयवाद मला या निवडणुकीत दिसून येत नाही.तुमच्या क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्व देतात?हल्ली साहित्य, कला क्षेत्राला सर्वच पक्ष बेदखल करताना दिसताहेत. विचारवंत, साहित्यिक यांना अडगळीत टाकल्यासारखी परिस्थिती आहे. वास्तविक निकोप समाजस्वास्थ्यासाठी साहित्य, कला क्षेत्राला उभारी देण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. विकास म्हणजे केवळ दगड विटांची बांधकामे नव्हे. निकोप मनाचा नागरिक उन्नत देश घडवू शकेल. निकोप मनाच्या घडणीसाठी निकोप साहित्य, सांस्कृतिक वातावरण हवे. अभिव्यक्तीचा संकोच होता कामा नये.नवीन मतदारांना काय आवाहन कराल?मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. त्याद्वारे आपला आशाआकांक्षांना सत्यात उतरवण्याची व आपल्या स्वप्नातील देश घडवणाऱ्या धुरीणांना निवडण्याची संधी असते. त्याचा वापर जरूर करावा.

टॅग्स :Jalgaonजळगाव