भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव महामार्गावर व्हाय पॉर्इंटजवळ २५ रोजी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली होती, त्यापैकी एक ट्रक अजूनही महामार्गावर नादुरुस्त स्थितीत उभा आहे, यामुळे रात्री भरधाव जाणाऱ्या वाहनांना उभ्या ट्रकचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची मालिका सुरूच असून, २८ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गॅलवणाइपट्या घेऊन जाणारा ट्रक ट्राला उलटला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.साकेगाव महामार्गावर २५ रोजी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली होती. यातील ट्रक क्रमांक सीजी-०४-एचटी- ९११२ हा ट्रक सलग चौथ्या दिवशीही नादुरुस्त स्थितीत जागेवरच उभा आहे. २८ रोजी रात्री जळगावकडून भुसावळकडे ट्रक ट्राला क्रमांक आरजे-०७-जीसी-७४४३ हा जात असताना बंद होत असलेला ट्रकचा अंदाज चालकास आला नाही व समोरून अचानक वाहन आल्यामुळे वाहनाने स्वत:ला वाचविण्यासाठी ट्रॉला महामार्गाच्या विरुद्ध दिशेने उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकचा भाग वेगळा तर मागील भाग पूर्णत: उलटला. सलग चौथ्या दिवशी या ठिकाणी तीन अपघात झाले असून, २६ रोजी जळगावचे दोन-दोन जाण्यास ठिकाणी गंभीर झाले होते.
साकेगाव येथे महामार्गावर सलग चौथ्या दिवशी तिसरा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:55 IST
रस्त्यावरील अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॉला उलटला, अपघाताची मालिका सुरूच
साकेगाव येथे महामार्गावर सलग चौथ्या दिवशी तिसरा अपघात
ठळक मुद्देयाच मार्गावरून साकेगावकर दर दहा मिनिटांनी भुसावळसाठी ये-जा करतात. चारशेपेक्षा जास्त शाळकरी मुले वाहनातून भुसावळला जातात. अजूनही ट्रक जागेवरच उभा असल्याने साकेगावकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.लवकरच ट्रक जागेवरून न हलवल्यास ट्रकला जाळण्याची भाषा संतापातून व्यक्त करण्यात येत आहे.